मी जातीनं वंजारी, पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय; बीडमध्ये देशमुख कुटुंबासाठी जितेंद्र आव्हाड कडाडले
बीडमध्ये वंजारी समाजाच्या अनेकांची हत्या झालीय. मी देखील जातीनं वंजारी आहे. पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय. पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणू देणार आहे का? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला.
Jitendra Awhad : बीडमध्ये वंजारी समाजाच्या अनेकांची हत्या झाली आहे. मी देखील जातीनं वंजारी आहे. पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आहे. पुसलं गेलेलं कुंकू कोणी परत आणू देणार आहे का? तरीदेखील आपण राजकारण करतो. या ताईच्या भविष्याचा कोणाला विचार आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला. मी शांत बसणार नाही, याविरोधात लढणार असल्याचे आव्हाड म्हणाले. तुम्ही वाल्मिक का म्हणता? हा वाल्मिक नाही वाल्या आहे. वाल्याचा वाल्मिकी झाला होता पण इथं वाल्मिकीचा वाल्या झाला असल्याचे आनव्हाड म्हणाले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या विरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.
वेळेत कारवाई झाली नाहीतर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नसल्याचे आव्हाड म्हणाले. हा शिवराज बांगर, याच्यावर किती गुन्हे वाल्याने दाखल केले विचारा. हा घरात कमी आणि कोर्टात जास्त असतो. बीडच्या परिस्थितीला पालकमंत्री आणि पोलीस जबाबदार आहेत असे म्हणत नाव न घेता आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. इथला प्रत्येक अधिकारी धनंजय मुंडेलाच विचारुन करणार असाल तर कशी हिंमत होईल त्यांची. तुम्हाला सगळं माहिती आहे असेही आव्हाड म्हणाले.
वेळीच कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रमध्ये आग लागल्याशिवाय राहणार नाही
कुठून आणलं हे राजकारण? उद्या तुमचं घरं जळेल तेव्हा कोणीही येणार नाही असे आव्हाड म्हणाले. तुमच्यातली माणुसकी जिवंत ठेवा. वेळीच कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रमध्ये आग लागल्याशिवाय राहणार नाही असे आव्हाड म्हणाले. चौकशीचे खोटे नाटक करु नका, या कुटुंबाला उगाच अपेक्षा दाखवू नका असेही आव्हाड म्हणाले. आका बिका कोण नाही. आकाचा बाप कोण? (लोकातून आवाज धनंजय मुंडे) असा सवालही जनतेला आव्हाड यांनी केला. दारु, मटके सगळे धंदे यांचे आहेत. त्यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय आधी त्याला मंत्रिमंडळतून काढून टाका असे म्हणत आव्हाडांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
न्यायलयीन कोठडीत माणूस कसा मरु शकतो? आव्हाडांचा सवाल
परभणीत देखील सोमनाथ सूर्यवंशीला मारलं गेलं, त्याला कसं मारलं? तो पोलीस कोठडीत नाही न्यायलयीन कोठडीत मेला. न्यायलयीन कोठडीत माणूस कसा मरु शकतो? असा सवाल देखील आव्हाड यांनी केला. महाराष्ट्रत सुरु असलेल्या प्रकराबद्दल बोला. अन्यथा महाराष्ट्रमध्ये असे अनेक वाल्या फिरतायत. खंडणी कशासाठी? सत्य नारायण पूजेसाठी नाही तर दोन महिन्याआधी निवडणुकीत फंडासाठी मागितल्याचे आव्हाड म्हणाले. 15 वर्षाची मुलं इथ पिस्तूल घेऊन फिरत आहेत. नरभक्षक रमण राघवला संपविल्याशिवाय आता शांत बसू नका असेही आव्हाड यावेळी म्हणाले.