बोगस अधिकाऱ्यांची चिडफाड सरकारने केली नाही तर आम्ही करू, आमदार बच्चू कडूंचा सरकारला इशारा
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी केलेले कारनामे उघड होत आहेत. दरम्यान, आमदार बच्चू कडूंनी ही सरकार कमी पडलं तर आम्ही कारवाई करू असा इशारा सरकारला दिलाय.
Bacchu Kadu: दिव्यांगाचे प्रमाणपत्र वापरणारे बोगस अधिकारी यांची माहिती गोळा करत आहोत. दिव्यांगांसारख्या वेदनादायी घटकाचा आरक्षण हिसकावून घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे चिरफाड आम्हीच करणार, यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार कमी पडलं तर आम्ही ते काम करू असा इशारा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिलाय. आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. देवणी येथील शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना ते हजर होते.
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी केलेले कारनामे उघड होत आहेत. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग प्रमाणपत्र वापरून अनेक अधिकारी यांनी सरकारी नोकरीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम सुरू केला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई अपेक्षित असल्याचे सांगत सरकारला इशारा दिला.
त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी केलेले कारणामे उघड होत आहेत. बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी रुपेश पागोरे यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवली आहे. असेच प्रकार राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी केल्याचं आता उघड होत आहे. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी ही सार्वत्रिक भावना असून सरकार ही कारवाई करण्यास असमर्थ असेल तर आम्ही ती करू असे बच्चू कडू म्हणाले.
आमचे 16 मुद्दे आहेत, जे ते मान्य करेल त्याला आमचा पाठिंबा- बच्चू कडू
राज्यातले सरकार सध्या ज्या योजना आणत आहे त्यांच योजना काँग्रेसने आणण्याचा प्रयत्न केलाय. जर महायुती सरकार तेच करणार असेल तर काय अर्थ आहे. आमचे 16 मुद्दे आहेत, ते जर मान्य होतं असतील तर ते जे कोणी मान्य करेल त्या आघाडी, युतीला आमचा पाठिंबा असेल, असेही बच्चू कडू म्हणाले. आम्ही मुद्यावर लढतोय आम्हला विधानसेभेची अपेक्षा नाही. मुद्दा मान्य झाला तर ज्यांनी तो मान्य केला त्यांना आम्ही पाठिंबा देणार असल्याचेही ते म्हणाले.
छ. संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू - बच्चू कडू
सध्याघडीला देशात मोठा प्रश्न आर्थिक विषमतेचा आहे. काम करणार्याला कमी पैसे आणि एजन्टला जास्त पैसे मिळतात. काम न करणार्यासाठी शासन आहे का, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तर दुसरीकडे शासन लेक लाडकी योजना जाहीर करते आहे. कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. पैसे नसतील तर त्यांना सल्ला आहे. तर दुसरीकडे गर्व्हनरचा बंगला चाळीस एकर वर आहे. अशा परिस्थितीत तो विका त्याचे एक लाखभर कोटी येतील, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. ज्या पारशी लोकांनी अत्याचार केले. त्यांच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी मुंबईत आहे. कष्ट करणार्याचे मूल्य जपले पाहिजे. दिव्यांग, कष्टकरी यांचा बजेटमध्ये किती वाटा आहे, हे आम्ही विचारतोय. श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याचे मार्ग आम्ही तोडतोय. तर येत्या 9 ऑगस्टला संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर मग अंतिम निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू म्हणाले.