शिवसेनेच्या कार्यकर्त्याला धमकवल्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
Kolhapur Loksabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला धमकावल्या प्रकरणी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur Loksabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला धमकावल्या प्रकरणी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेतर्फे मिसळ पे चर्चा कार्यक्रम घेतला म्हणून शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजाराम गायकवाड (Rajaram Gaikwad) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश भद्रा या कार्यकर्त्यांने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
न्यू पॅलेस परिसरातील घटना
शिवसेनेच्या कार्यकर्त्याला धमकवल्याचा प्रकार शाहू महाराजांच्या न्यू पॅलेस या निवासस्थानाजवळ घडला आहे. शिंदे गटाकडून कोल्हापुरात मिसळ पे चर्चा हा कार्यक्रम घेण्यात आला होता. मात्र, कार्यक्रम घेतला म्हणून शिवीगाळ करण्यात आली, असा आरोप शिंदे गटाचे कार्यकर्ते करत आहेत. या प्रकरणी राजाराम गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजाराम गायकवाड हे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे कट्टर समर्थक आहेत.
कोल्हापूरात शाहू महाराज वि. संजय मंडलिक
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती वि. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुन्हा एकदा संजय मंडलिक यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, यावेळी संजय मंडलिकांसमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण गेल्यावेळी ज्यांनी मंडलिक यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं, ते काँग्रेस नेते सतेज पाटील आता विरोधात आहेत. कोल्हापुरात सेनेचा विद्यमान खासदार असतानाही उद्धव ठाकरेंनी ही जागा काँग्रेस पक्षाला सोडली आहे. तर त्याबदल्यात सांगलीची जागा खेचल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचे कोल्हापूर दौरे वाढले
कोल्हापूर लोकसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. कारण मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूर दौरे आणि मुक्काम वाढले आहेत. शिंदे सातत्याने कोल्हापूर दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ज्या हॉटेलमध्ये राहिले, त्या हॉटेलमध्ये काल रात्री 12 वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेटले, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला होता. शिवाय, मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करणार असंही सतेज पाटील यांनी म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray Speech : कोकणातले धंदे गुजरातला जात आहेत, वा रे वा 5 वर्षे यांच्यासोबत सत्तेत होतात, तेव्हा का बोलला नाहीत, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
