एक्स्प्लोर

Nashik Accident News : दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण जखमी; नाशिकमधील घटना

Nashik Accident News : जिल्ह्यात दोन अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यात घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik Accident News नाशिक : नाशिक जिल्ह्यात अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसात जिल्ह्यात दोन अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना निफाड (Niphad) तालुक्यात आहे. निफाड तालुक्यात पुलाचा कठडा तोडून ट्रक थेट नाल्यात घुसला. यात चालक जखमी झाला आहे.

दुसरी घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) मुंढेगाव फाट्याजवळ घडली आहे. रविवारी सकाळी नाशिककडून (Nashik Accidnet News) मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्तीस जोरदार धडक दिली. यामुळे वयोवृद्ध व्यक्ती जखमी (Injured) झाली. दोन्ही घटनेतील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. 

चालकाचं नियंत्रण सुटलं अन् ट्रक थेट नाल्यात कोसळला

पुलाचा कठडा तोडून कापसाने भरलेला ट्रक (Truck) नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे (Pimpalas Ramache) येथे ही घटना घडली.  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील आयशर ट्रक छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथून नाशिकच्या दिशेने शनिवारी रात्री जात होता. पिंपळस गावाजवळील रस्त्यावरील वळणाचा अंदाज ट्रक चालकास आला नाही. त्यानंतर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक पुलाचा कठडा तोडून नाल्यामध्ये कोसळला.

वळणामुळे होतात सतत अपघात

या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने निफाड येथील शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या जीवघेण्या वळणामुळे तसेच रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रकाश झोतामुळे वारंवार अपघात घडतात, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. 

टेम्पोच्या धडकेत वृद्ध जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव फाट्याजवळ (Mundhegaon Phata) टेम्पोच्या धडकेत एक जण जखमी झाला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या एका वयोवृद्धाला जोरदार धडक दिली. या धडकेत वृध्द जखमी (Injured) झाला. भाऊसाहेब पांडुरंग लोहकरे (71 रा. घोटी, इगतपुरी) असे जखमीचे नाव आहे. जखमीला तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात (Ghoti Rural Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

National Youth Festival : मैदानांची युद्धपातळीवर डागडुजी; 20 समित्यांची नेमणूक, 75 अधिकाऱ्यांवर जबाबदारी

Nylon Manja : गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची मिळाली माहिती; पोलिसांनी सापळा रचत ठोकल्या बेड्या, 70 गट्टू जप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?
सिडकोचं तळोजातील स्वस्त घर 25 लाखांना, खारघरमधील सर्वात महाग घर 97 लाख रुपयांना, नोंदणी कशी करायची?
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari on Suresh Dhas : 24 वर्ष जुनी केस, सुरेश धसांना घेरलं! अमोल मिटकरींचे खळबळजनक आरोपABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 08 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सJitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा8-Year-Old Dies Of Cardiac Arrest : 8 वर्षीय मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना आला झटका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?
सिडकोचं तळोजातील स्वस्त घर 25 लाखांना, खारघरमधील सर्वात महाग घर 97 लाख रुपयांना, नोंदणी कशी करायची?
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
Beed Crime: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, खंडणीप्रकरणात पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं
Embed widget