एक्स्प्लोर

Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण

Beed crime: बीड पोलीस दल सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱा वाल्मिक कराड बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत आहे.

बीड: गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंतीलगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अनंत मारोती इंगळे (रा. कळंमआंबा ता.केज जि बीड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या का केली ? हे अद्याप अस्पष्ट असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी सध्या सीआयडी आणि विशेष तपास पथकाचे (एसआयटी) अधिकारी सध्या बीड शहरात तळ ठोकून आहेत. बीड शहर पोलीस ठाणे हे सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे केंद्रस्थान आहे. याच पोलीस ठाण्यात आरोपी वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी अनंत इंगळे यांनी आत्महत्या केल्याने चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणात आता पोलीस पुढे काय तपास करणार, हे पाहावे लागेल. अनंत इंगळे यांच्यावर नेमका कोणता दबाव होता की त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासातून काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

पोलिसांचे वाल्मिक कराडशी लागेबांधे असल्याचा आरोप

बीड जिल्ह्यातील अनेक पोलिसांचे वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याची माहिती समोर आली होती. वाल्मिक कराड आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या पोलीस कर्मचाऱ्यांचा संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात आलेल्या एसआयटीत समावेश होता. आरोप झाल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांना एसआयटीतून काढण्यात आले होते. 

बीडमध्ये घडामोडींना वेग, सीआयडीकडून वायबसे दाम्पत्याची चौकशी

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोप सुदर्शन घुले आणि सांगळे यांना शोधून काढण्यात ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती, त्या वायबसे दाम्पत्याची सीआयडीकडून पुन्हा चौकशी केली जाणार आहे.  संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुन्हा संभाजी वायबसे व सुरेखा वायबसे या दोघांची सीआयडीकडून चौकशी होणार आहे. यापूर्वीच संभाजी वायबसे आणि सुरेखाबाई वायभसे यांची सीआयडीने चौकशी केली होती, मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले होते. या हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याच्या तपासासंदर्भात वायबसे दाम्पत्याची चौकशी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

आणखी वाचा

वाल्मिक कराडच्या कृष्णकृत्यांची पाळमुळं खणून काढणाऱ्या सुरेश धसांवर पहिला वार, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Embed widget