एक्स्प्लोर

Beed Crime: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग

Santosh Dehsmukh case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड गोत्यात. विष्णू चाटे याच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी घेतले. आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप

बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्याभोवतीचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात गुन्हा दाखल नसला तरी या सगळ्याचे मूळ असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड याने आरोपी विष्णू चाटे याच्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. नंतर विष्णू चाटे हाच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी गेला होता, असा आरोप आहे. त्यादृष्टीने आता पोलीस तपास करत असून त्यांनी विष्णू चाटे याचे व्हॉईस सॅम्पल्स घेतले आहेत. 

विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही, त्याचाही तपास सध्या सुरु आहे. त्याच खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल तपासले जाणार आहेत. मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे व्हाईस सॅम्पल सीआयडीकडून कलेक्ट करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडने अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो. तर वाल्मिक कराड याचेही व्हाईस सॅम्पल घेऊन ते मॅच होतात का हे तपासले जाणार आहेत. त्यामुळे या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, पवनचक्की मालकांना खंडणीसाठी येणाऱ्या धमक्यांसंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला असल्याचीही माहिती आता समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चार दिवस आधीच शरद पवार यांनी हा फोन केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शरद पवार यांना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने दिली.

सीआयडीकडून वायबसे दाम्पत्याची पुन्हा चौकशी

संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुन्हा संभाजी वायबसे व सुरेखा वायबसे या दोघांची सीआयडीकडून पुन्हा चौकशी होणार आहे. यापूर्वीही संभाजी वायबसे आणि सुरेखाबाई वायभसे यांची सीआयडीने चौकशी केली होती, मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले होते. आम्ही पुन्हा गरज लागल्यास तुम्हाला चौकशीला बोलावून घेऊ, असे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी वायबसे दाम्पत्याला सांगितले होते. या हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याच्या तपासासंदर्भात वायबसे दाम्पत्याची चौकशी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळे यांना शोधून काढण्यात वायबसे दाम्पत्याने दिलेली माहिती महत्त्वाची ठरली होती.

आणखी वाचा

बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
प्रेम प्रकरण ते जुना वाद! बंदुकीतून तीन राऊंड फायर, पुतण्याकडून चुलत्यावर गोळीबार, परळी हादरली 
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget