एक्स्प्लोर

Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेतील 26000 घरांच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. या घरांसाठी नोंदणीची शेवटची तारीख 10 जानेवारी आहे.

नवी मुंबई :  शहर व औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सिडकोकडून राज्यातील विविध शहरात घरांची निर्मिती केली जाते. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन देण्याचं काम सिडकोकडून करण्यात येतं. सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे 26 हजार घरांची विक्री करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोनं काल नवी मुंबईतील विविध ठिकाणांवरील घरांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. या घरांच्या किंमती 25 लाख रुपयांपासून 97 लाख रुपयांपर्यंत आहे. सिडकोचं सर्वात कमी किमतीचं घर तळोजा येथे आहे. तर, सर्वाधिक किमतीचं घर खारघर येथे आहे. खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर अ च्या घराची किंमत 97.20 लाख रुपये आहे.

कोणत्या ठिकाणचं घर किती किमतीला? 

कामोठे परिसरातील खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28 या भागातील एक बीएचके म्हणजेच 322  चौरस फूट घराची किंमत 46.70 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी 1470 घरं आहेत.  मानसरोवर रेल्वे स्टेशन सेक्टर 39   येथील एक बीएचके म्हणजेच 322 चौरस फूट घराची किंमत  41.90 लाख रुपये आहे. 

तळोजा सेक्टर 37 येथे 816 घरं असून याची किंमत 34.20 लाख रुपये आहे. तळोजा सेक्टर-28  येथे 2185 घरं असून एका घराची किंमत 25.10 लाख रुपये आहे. तळोजा सेक्टर 39 मध्ये एक बीएचके घराची किंमत  26.10 लाख रुपये असून इथं 7509 घरं आहेत.

पनवेल बस टर्मिनल सेक्टर 8 मधील घरांची किंमत 45.10 लाख रुपये आहे. इथं एकूण 172 घरं आहेत. 

वाशी ट्रक टर्मिनल सेक्टर 19 येथे 3131 घरं आहेत. वाशीतील घरांची किंमत 74.10 लाख रुपये आहे. 

खारघर बस टर्मिनल सेक्टर 14 मधील एक बीएचके घराची किमंत 48.30 लाख रुपये आहे. इथं एकूण 340 घरं आहेत. या घराचं क्षेत्रफळ 322 चौरस फूट आहे. 

खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर 1 अ येथील टू बीएचके घराची किंमत 97.20 लाख रुपये आहे. या घरांचं क्षेत्रफळ  540 चौरस फूट आहे. इथं एकूण 1803 घरं आहेत. 

खारघर बस डेपो सेक्टर 14 मध्ये एक बीएचकेची 1700 घरं असून त्याची किंमत 48.30 लाख रुपये आहे. 

कळंबोली बस डेपो सेक्टर 17 मध्ये 1360 घरं असून एक बीएचके घराची किंमत 41.90 लाख रुपये आहे. 

उलवे येथे खारकोपर 2 ए सेक्टर 16 मध्ये 1 बीएचके घरांची किंमत 38.60 लाख रुपये आहे. खारकोपर 2 बी सेक्टर 6 येथे 288 घरं असून एका तिथल्या घराची किंमत 38.60 लाख रुपये आहे. 

उलवे बामनडोंगरी सेक्टर 6 येथे 1700 घरं असून एका घराची किंमत 31.90 लाख रुपये आहेत. 

उलवे खारकोपर सेक्टर 16 ए येथे 2113 घरं आहेत.इथल्या एका घराची किंमत 40.30 लाख रुपये आहे. 

माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेच्या नोंदणीचे टप्पे

1.नोंदणीसाठी संकेतस्थळाला भेट द्या, तुमचे पूर्ण नाव आणि मोबईल क्रमांक प्रविष्ट करा.नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करून लॉगीन करा. 
2.आधार क्रमांक प्रविष्ट करून, आधार ओटीपी पडताळणी करा.
3.पॅनचे तपशील प्रविष्ट करा.
4.गट निवडा आणि सह-अर्जदाराचे तपशील भरा (लागू असल्यास) आणि सर्व स्वसाक्षांकित कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र अपलोड करा.
5.एकवेळ भरावयाचे विनापरतावा नोंदणी शुल्क ₹236/- (GST सह) भरा व अर्ज जमा करा.

इतर बातम्या :

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची संधी चुकवू नका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad PC :10 वर्षात झालेल्या खुनांपैकी 80 टक्के खून कराडनं केले, जितेंद्र आव्हाड यांचा दावा8-Year-Old Dies Of Cardiac Arrest : 8 वर्षीय मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना आला झटकाABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 08 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सBhandara Tiger : झाडाझुडपात अडकलेल्या वाघासह फोटोसेशन,थरकाप उडवणारा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Accident: आईसोबत शाळेतून घरी जाताना भरधाव ट्रक आला अन्.... कल्याणमधील अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
मोठी बातमी: कल्याणमध्ये KDMCच्या कचऱ्याच्या ट्रकने मायलेकाला उडवलं, दोघांचाही जागीच मृत्यू
Kedar Jadhav : टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू BJP मध्ये करणार प्रवेश? 'त्या' भेटीमुळे राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
बारामतीचा नादच खुळा... AI च्या माध्यमातून ऊस शेती, सत्या नाडेलांकडून ADT चं कौतुक; शरद पवारांचं खास ट्विट
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
Beed Crime: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, खंडणीप्रकरणात पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
Embed widget