Nashik News : बस्स झालं! रस्ता खोदतांना दहा वेळा विचार करा, अन्यथा.... नाशिक महापालिकेचा महत्वाचा निर्णय
Nashik News : नाशिक महापालिकेने शहरातील रस्ते फोडण्यास तसेच रस्त्यावर कामे करण्यास बांधकाम विभागाने बंदी घातली आहे.

Nashik News : नाशिक महापालिकेने (Nashik) नाशिककरांच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आजपासून शहरातील रस्ते फोडण्यास तसेच रस्त्यावर कामे करण्यात बांधकाम विभागाने बंदी घातली आहे. मुदतीनंतर कोणत्याही कंपनीने रस्ता फोडला, तर त्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा नाशिक महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिला आहे.
गेल्या पावसाळ्यात नाशिक (Nashin NMC) शहरातील रस्त्यांची वाईट अवस्था झाल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या महापालिकेच्या बांधकाम विभाग यंदा एमएनजीएलसह खाजगी कंपन्यांना रस्ते फोडण्यासंदर्भातील (Road Work) दिलेली वाढीव मुदत बुधवारी संपुष्टात आली. पुन्हा मुदतवाढ देण्याची केलेली मागणी बांधकाम विभागाने फेटाळली आहे. एकीकडे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहरात घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्यासाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी खोदण्यात येत असलेल्या रस्त्यांमुळे दोन वर्षांपासून नाशिककर त्रस्त आहेत. याआधी शहरात विविध मोबाईल कंपन्यांनी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकत्व झाले होते त्यात आता एम एमएनजीएलने दोन वर्षांपासून गॅस पाईपलाईनच्या नावाखाली खोदायचे सत्र सुरू ठेवले असून अद्याप काम पूर्ण झालेले नाही तसेच याची मुदतही संपल्याचे नाशिक महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान रस्ते खोदण्यासंदर्भात दिलेली मुदतवाढ ही 10 मे रोजी संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे 11 मे पासून एमएनजीएलसह मोबाईल कंपन्यांसह कोणत्याही खाजगी ठेकेदाराला रस्ता खोदता येणार नाही. मुदतीनंतरही रस्ता खोदला तर संबंधितांविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश वंजारी यांनी संबंधित अभियंता, कार्यकारी अभियंतांना दिले आहेत. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाने अधिकाऱ्यांना दिला आहे.
तसेच मागील वर्षी पावसाळ्यात रस्ते खोदकाम झाल्याने नाशिककरांचे कंबरडे मोडले होते. त्यावरून नाशिककरांनी महापालिकेला धारेवर धरले होते. त्यामुळे आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते खोदकामास कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. एमएनजीएलसह खाजगी कंपन्यांना रस्ते खोदण्यासाठी दिलेली मुदतवाढ बुधवारी संपुष्टात आले आहे. त्यामुळे गुरुवारपासून रस्ते खोदल्यास गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती नाशिक मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे.
अपूर्ण कामे पूर्ण करा....
दरम्यान महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी व इतर मोबाईल कंपन्या आणि खाजगी संस्थांना व्यवसायिक कारणास्तव रस्ता खोदायचा असेल तर 30 एप्रिलपर्यंतच मुभा होती. मात्र खाजगी कंपन्यांनी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दहा दिवसांची अतिरिक्त मुदत मागितली होती. त्यानुसार पालिकेने मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नवीन मुदत मागितली गेली. मात्र पालिकेने नवीन रस्ते खोदकामावर बंदी घातली असून अपूर्ण रस्ते 25 मे 2023 पर्यंत पूर्ण करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे एमएनजीएलसह मोबाईल कंपन्यांसह कोणत्याही खाजगी ठेकेदाराने रस्ता खोदल्याचे आढळल्यास संबंधितांविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
