National Youth Festival : देशभरातील युवकांना होणार नाशिकच्या संस्कृतीची ओळख; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य
National Youth Festival : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची (Nashik) निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महोत्सवाचा मॅस्कॉट, लोगोचे लॉंचिंग करण्यात आले.
![National Youth Festival : देशभरातील युवकांना होणार नाशिकच्या संस्कृतीची ओळख; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य Chief Minister Eknath Shinde unveiled the mascot logo of National Youth Festival nashik maharashtra marathi news National Youth Festival : देशभरातील युवकांना होणार नाशिकच्या संस्कृतीची ओळख; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/05/dc7e002e5400defd8897b1f78a1251461704465113812923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
National Youth Festival नाशिक : यंदा राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची (Nashik) निवड करण्यात आली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनचा अनावरण सोहळा शुक्रवारी पार पडला. केंद्रीय क्रीडा व सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला ऑनलाईन उपस्थित होते.
महाराष्ट्र गिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महोत्सवाचा मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनचे लॉंचिंग करण्यात आले. लोगो अनावरण सोहळ्याला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोड, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
देशभरातील युवकांना होणार नाशिकच्या संस्कृतीची ओळख
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आपण अनेक बैठका घेतल्या आहेत. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आश्वासन देतो की, या महोत्सवात काहीही कमी पडणार नाही, यशस्वी नियोजन करू. तीन मंत्री नाशिकला आहेत ते तिथेच मुक्काम करतील. देशभरातील युवकांना नाशिकच्या संस्कृतीची ओळखही आम्ही करून देऊ, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन येथील मैदानावर उद्घाटन होणार आहे. यावेळी हेलिपॅड ते कार्यक्रमस्थळ असा रोड शो होणार आहे. महोत्सवाच्या आयोजनात कुठलीही कमतरता ठेवली जाणार नाही. राज्यातील दीड ते दोन लाख युवक-युवती त्यात सहभागी होतील.
'शेकरू' करणार ब्रॅण्डिंग
अपेक्षेपेक्षा चांगला कार्यक्रम करू. आम्हाला आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल मोदीजी, ठाकुरजी तुमचे धन्यवाद मानतो. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी 20 समित्या गठीत केल्या आहेत सर्व युवक खेळाडूपर्यंत या कार्यक्रमाची माहिती मिळाली पाहिजे. उद्घाटनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये हा कार्यक्रम होतोय, 22 ला अयोध्येत सोहळा होत असताना नाशिकच्या या कार्यक्रमातही याचे रंग बघायला मिळतील. शेकरू प्रेरणा देतो आणि अनेक अर्थाने तो ओळखला जात असल्याने या महोत्सवाच्या बोधचिन्हासाठी राज्यप्राणी 'शेकरू'ची निवड करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
दरम्यान, या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी तपोवनातील मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त संदीप, जिल्हाधिकारी आणि ईतर सर्व विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. हेलिपॅड, सभा मंडप, पार्किंग याबाबत त्यांनी आढावा घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)