
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis: आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी, एकमेकांचे वैरी नाही; काँग्रेसच्या खळबळजनक आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis On Congress: नाना पटोले आमचे शत्रू नाही. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis On Nana Patole Car Accident : काँग्रेसने भाजपवर जे आरोप केले आहे त्याला स्वत: नाना पटोले (Nana Patole) दुजोरा देतील, असे मला वाटत नाही. या अपघाताची माहिती मिळताच मी स्वतः हून नाना पटोले यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. आम्ही राजकीय जीवनात जरी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी, व्यक्तिगत जीवनात आम्ही एकमेकांचे शत्रू नाही किंवा आमच्यात तसे वैरही नाही. राजकारणात नक्कीच वैचारिक पद्धतीचा सामना रंगत असतो, मात्र ते आमचे चांगले मित्र असून या अपघाताची माहिती मला मिळताच मी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांनी दिली.
मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अशी परिस्थिती यापूर्वी कधी उद्भवली आहे, नाही यापुढे कधी उद्भवणार. असा विश्वास दर्शवत काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी भाजपवर केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले आहेत.
आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी, एकमेकांचे वैरी नाही
नाना पटोले यांच्या अपघाताची माहिती मिळताच मी त्यांची विचारणा केली असता, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, अपघात मोठा असून त्यातून मी सुखरूपपणे बचावलो असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे भव्य सभा पार पडणार आहे. या सभेसाठी देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर आले असता ते बोलत होते.
पंतप्रधानांच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा आज नागपूर जिल्ह्यात होत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आठवड्याभरात सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजपच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधानांची आज कन्हान येथे जाहीर सभा होणार असून ही अतिशय आनंदची गोष्ट आहे.
नुकतेच चंद्रपूरमध्ये पार पडलेल्या पंतप्रधानांच्या सभेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, तसाच प्रतिसाद आज कन्हानच्या सभेला देखील मिळणार आहे. मोदीजींवर जनतेचा प्रचंड प्रेम आहे. त्यांची एक झलक बघण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे आजची सभा देखील अशीच अभूतपूर्व राहील, असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी बोलतांना व्यक्त केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
