(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
Bangladesh Cricketer Unsold in IPL : मोठी गोष्ट म्हणजे या देशातील 12 खेळाडूंनी लिलावात प्रवेश केला होता, मात्र 2 खेळाडूंशिवाय अन्य कोणाचेही नाव बोलीसाठी घेण्यात आले नव्हते.
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 सीझनचा मेगा लिलाव सौदी अरेबियात झाला. दोन दिवस चाललेल्या या मेगा लिलावात 10 संघांनी 639.15 कोटी रुपये खर्च करून एकूण 182 खेळाडूंना खरेदी केले. यावेळी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी इतिहास रचला आहे. पंतला लखनौ सुपर जायंट्सने ते 27 कोटी रुपयांना विकत घेतले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर ठरला. दुसरा सर्वात महागडा क्रिकेटर श्रेयस होता, त्याला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. दुसरीकडे, असाही एक देश समोर आला आहे ज्याचा खेळाडू विकला गेला नाही. मोठी गोष्ट म्हणजे या देशातील 12 खेळाडूंनी लिलावात प्रवेश केला होता, मात्र 2 खेळाडूंशिवाय अन्य कोणाचेही नाव बोलीसाठी घेण्यात आले नव्हते.
पाकिस्तानपाठोपाठ बांगलादेशही बनत आहे 'साइड लाइन'
बांगलादेशही 'शांतपणे' बाजूला पडला असे म्हणता येईल. सत्तापालटानंतर हिंदूंवरील अत्याचाराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नुकतेच हिंदू पुजारी आणि इस्कॉनचे माजी प्रमुख चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, आयपीएल मेगा लिलावात 12 बांगलादेशी (Bangladesh Cricketer Unsold in IPL) क्रिकेटपटू निवडले गेले. यापैकी फक्त मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हुसैन यांचीच नावे बोलीसाठी पुढे आली, पण त्यांना कोणी घेतले नाही.
बांगलादेशी क्रिकेटपटूही आयपीएलमधून बाहेर पडण्याचा धोका
उर्वरित 10 खेळाडूंमध्ये लिटन दास, तस्किन अहमद, शाकिब अल हसन, मेहदी हसन मिराज, शॉरीफुल इस्लाम आणि तन्झीम हसन शाकिब यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. मात्र यापैकी एकही नाव लिलावात पोहोचले नाही. त्यांना कोणीही विकत घेतले नाही. पाकिस्ताननंतर आता बांगलादेशही आयपीएलमधून बाजूला होत आहे. असेच सुरू राहिल्यास भविष्यात बांगलादेशी क्रिकेटपटूही आयपीएलमधून बाहेर पडण्याचा धोका संभवू शकतो. या यादीद्वारे जाणून घ्या, कोणत्या बांगलादेशी खेळाडूने कोणत्या आधारभूत किंमतीसह आयपीएल लिलावात प्रवेश केला होता.
पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलचा एकच हंगाम खेळले
2008 मध्ये आयपीएलचा पहिला सीझन खेळला गेला होता. त्यावेळी पाकिस्तानचे एकूण 11 खेळाडू आयपीएलमध्ये खेळले होते. 2008 च्या आयपीएल हंगामानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नव्हते आणि राजकीय तणावामुळे पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी देण्यात आली नाही. अशाप्रकारे, पाकिस्तानी खेळाडूंना पहिल्या आणि शेवटच्यांदा आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 च्या मोसमात संधी मिळाली. IPL च्या पहिल्या सत्रात 11 पाकिस्तानी खेळाडूंनी धुमाकूळ घातला. सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हाफीज, उमर गुल, कामरान अकमल, युनूस खान, सोहेल तन्वीर, मोहम्मद आसिफ, शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह उल हक हे खेळाडू आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या