विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Dhule Crime News : विस्तार अधिकाऱ्याने ग्रामसेविकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार धुळे जिल्ह्यात उघडकीस आलाय.

धुळे : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विस्तार अधिकाऱ्याने ग्रामसेविकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार घडलाय. यानंतर संतप्त महिला ग्रामसेविकेने विस्तार अधिकाऱ्याला काळ फासून चांगलाच चोप दिलाय. महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकारे याने ग्रामसेविका महिलेचा विनयभंग करून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. शिंदखेडा पंचायत समितीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पंचायत समितीत एकच खळबळ उडाली आहे.
विस्तार अधिकार्याला फासले काळे
यानंतर संतप्त महिला ग्रामसेविका आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी विस्तार अधिकार्याला काळे फासत चांगलाच चोप दिलाय. आता शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकारेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
घंटागाडीने दीड वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले
दरम्यान, मंगळवारी धुळे येथील सुभाष नगर परिसरात महापालिकेच्या घंटागाडीने दीड वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले. या अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे जुने धुळे परिसरातील नागरिक आणि चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ वाहन चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
