ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची अवस्था बिकट झाली आहे. उद्धव ठाकरे मनसेला साद घालणार का, दानवे म्हणाले...
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचा सुपडा साफ झाल्यानंतर राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची हवा पसरली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर विजय मिळवला. तर 128 जागा लढवणाऱ्या मनसेला एकाही जागेवर उमेदवार निवडून आला नव्हता. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधुंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावे, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यासाठी पुढाकार कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित होता. याबाबत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली.
मनसेला सोबत घेण्यासंदर्भात शून्य टक्के चर्चा आमच्या पक्षात आहे. मनसे किंवा आम्ही त्यांना साद घालू ,असं मला वाटत नाही होईल. मनसे नेमकी कोणासोबत होती हेच त्यांनी आधी क्लिअर करावं ? ते म्हणत होते, भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि दुसरीकडे भाजपच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिले होते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा एकूण सूर पाहता सध्यातरी मनसे आणि ठाकरे गटात एकत्र येण्याविषयी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे संकेत मिळत आहेत.
यावेळी अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले. गद्दारीचा रिवॉर्ड त्यांना मिळाला आहे. अडीच वर्षे ते मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्री कोण करायचा आहे, ते भाजप ठरवेल. त्यांच्याकडे एवढी मेजॉरिटी आहे. ते ठरवतील नेमका मुख्यमंत्री कोणाला करायचं, असे दानवेंनी म्हटले.
मातोश्रीवर ठाकरे गटाच्या पराभूत आमदारांची बैठक
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या ठाकरे गटाच्या आमदारांची गुरुवारी मातोश्रीवर बैठक पार पडली. याबाबत अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व पराभूत आणि विजयी उमेदवारांशी बैठकीत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचा म्हणणं जाणून घेतलं, त्यातील काही जणांचा म्हणणं होतं की आपण एकटं लढायला हवं होतं. 95 जागा आम्ही लढलो, 20 जागा जिंकलो. महाराष्ट्रभर शिवसेना पक्ष आहे 288 जागा लढलो असतो तर 40-50 जागा जिंकलो असतो, असा त्यांचं म्हणणं होतं.
पण महाविकास आघाडीसोबत आम्ही आता आहोत, वेगळा कुठलाही निर्णय झाला नाही. आमचे मतं महाविकास आघाडीमध्ये राहून कमी झाले नाही. काही ना काही तरी फायदा तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा फायदा शिवसेनेला झाला आहे. शिवसेनेचा फायदासुद्धा त्यांना झाला आहे, असे दानवेंनी सांगितले.
संघटना मजबुतीसाठी 288 जागासाठी तयारी करायला हवी. याचा अर्थ आम्ही स्वबळावर लढणार असा होतं नाही. कधी ना कधी स्वबळावर आमच्या पक्षाला सत्ता आणायची आहे पण त्यासाठी ताकद वाढवायला पाहिजे . लोकसभेनंतर काँग्रेसचे नेते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते. त्यामुळे जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्र मध्ये इंडिया आघाडीचे नुकसान झाले. ते मंत्रिपदचे विचार करायला लागले होते. निवडणुकीआधी ते काँग्रेस मुख्यमंत्रीपदासाठी तयारी करायला लागले होते. उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी ठेवला असता 5 टक्के मतदान महाविकास आघाडीचे वाढले असते, असा दावा अंबादास दानवे यांनी केला.
आम्ही मविआतच राहणार, अंबादास दानवेंचा दावा
आम्ही आता महाविकास आघाडीसोबत आहोत, वेगळा कुठलाही निर्णय झाला नाही. आमचे मतं महाविकास आघाडी मध्ये राहून कमी झाले नाही. काही ना काही तरी फायदा तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा फायदा शिवसेनेला झाला आहे. शिवसेनेचा फायदासुद्धा त्यांना झाला आहे . अनेक जागा काँग्रेसने लोकसभा निकाल आणि सर्वेचा दाखला देत शिवसेनेला दिल्या नाहीत. स्वतः कडे ठेवल्या आणि तिथे काँग्रेस उमेदवार पडले.संभाजीनगर पूर्वमध्ये आमची ताकद असताना सुद्धा आम्ही काँग्रेसला ती जागा दिली आणि तिथे उमेदवार पडल्याचे दानवे यांनी सांगितले.
शिवसेना हिंदुत्ववादी आहे, शिवसेनेचा मतं कमी झाली नाहीत उलट मुस्लिम मतं वाढले तर चांगलं आहे. आमचा मुस्लिम आमदार निवडून आला. शिवसैनिकांची भावना जी होती ती मी मांडली. महापालिका निवडणूक आम्ही याआधी स्वबळावर लढली होती आणि भाजपच्या पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, याकडे अंबादास दानवेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा
तुमचं नाव उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत; उदय सामंत म्हणाले, सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना!