Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेसचे नेते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते .त्यामुळे जम्मू काश्मीर हरियाणा आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे नुकसान झालं . असं अंबादास दानवे म्हणाले..

Ambadas Danve: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर मुख्यमंत्री पदावर कोण याची एकाच चर्चा सुरू आहे . महाराष्ट्रातील विधानसभेतील दारुण पराभवामुळे महाविकास आघाडीला काहीसा तडा गेल्याचे चित्र आहे . 288 जागांपैकी केवळ 46 जागा जिंकलेल्या महाविकास आघाडीच्या पराभवावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेते बोट ठेवताना दिसत आहेत . आता शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे आगामी निवडणुका लढतील अशी चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीला मिळालेल्या पराभवाचं एक कारण स्पष्ट केलंय .काँग्रेस नेत्यांचा लोकसभा निवडणुकीनंतरचा अति आत्मविश्वास हा या निवडणुकीत दिसला त्यामुळे महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला असल्याचं अंबादास दानवे म्हणालेत .
महाविकास आघाडीच्या पराभवानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठ्या गटाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी अशी भावना असल्याचे दानवे म्हणाले . शिवसेना सत्तेत आली की नाही याने फरक पडत नाही . सत्ता बळकवण्यासाठी पक्षाचा जन्म झाला नाही . ती एक विचारधारा आहे . मात्र भविष्यात पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी असं कार्यकर्त्यांच्या एका वर्गाचं मत असल्याचं ही दानवे म्हणाले .
आता एकट्याने लढायला हवं
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतेने मतांचे दान महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकत महायुती ऐवजी महाविकास आघाडीला संधी दिल्याचे दिसले . मात्र लोकसभेत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या नेत्यांचा अति आत्मविश्वास विधानसभेतील या पराभवाला कारणीभूत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत . ते म्हणाले, आमच्या पक्षप्रमुखांनी उद्धव ठाकरेंनी सर्व पराभूत आणि विजयी उमेदवारांचे बैठक घेतली . उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचे म्हणणं जाणून घेतलं त्यातील काही जणांचं म्हणणं होतं की आपण आता एकटा लढायला हवं .
स्वबळावर निवडून यायचे असेल तर ताकद वाढवायला हवी ..
95 जागा आम्ही लढलो वीस जागा जिंकलो महाराष्ट्रभर शिवसेना पक्ष आहे . 288 जागा लढलो असतो तर 40-50 जागा तरी जिंकलो असतो असं पक्षातील उमेदवारांचं म्हणणं होतं . पण महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत . वेगळा कुठलाही निर्णय झाला नाही . महाविकास आघाडीमध्ये राहून कमी झालं नाही . काही न काहीतरी फायदा झाला . असं दानवे म्हणाले . कधी ना कधीच व बळावर आमच्या पक्षाला सत्ता आणायची आहे . पण त्यासाठी ताकद वाढवायला पाहिजे असं म्हणत अंबादास दानवे यांनी सूचक वक्तव्य केलं .
'लोकसभेनंतर काँग्रेस नेते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ! ' अंबादास दानवे
लोकसभेनंतर काँग्रेसचे नेते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते .त्यामुळे जम्मू काश्मीर हरियाणा आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे नुकसान झालं . ते मंत्रिपदाचा विचार करायला लागले होते . निवडणुकीआधी काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी तयारी करत होते . असंही दानवे म्हणाले . उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदासाठी नाव ठेवलं असतं तर पाच टक्के मतदान महाविकास आघाडीचे वाढलं असतं .अनेक जागा काँग्रेसने लोकसभा निकाल आणि सर्वेचा दाखला देत शिवसेनेला दिल्या नाहीत स्वतःकडे ठेवल्या . अशा ठिकाणी काँग्रेस पडलं .
शिवसेनेची मुस्लिम मतं वाढली
संभाजीनगर पूर्व मध्ये आमची ताकद असताना सुद्धा आम्ही काँग्रेसला ती जागा दिली . तिथे त्यांचा उमेदवार पडला . शिवसेना हिंदुत्ववादी आहे . शिवसेनेची मत कमी झाली नाहीत उलट मुस्लिम मतं वाढली . आमचा मुस्लिम आमदार निवडून आला . महापालिका निवडणूक आम्ही याधीश व बळावर लढलो होतो . भाजपच्या तुलनेत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या होत्या असं दानवे म्हणाले .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
