एक्स्प्लोर
Kho-Kho Premier League : चक्क खो-खोची प्रीमियर लीग! नागपुरात क्रीडा मशाल प्रज्वलन करून योगेश मोरे यांनी केले उद्घाटन
महाराष्ट्र क्रीडा मंडळाद्वारे नागपुरात पहिल्यांदाच ‘एमकेएम खो-खो प्रिमियर लीग–2024’चे आयोजित करण्यात आले.

Kho-Kho Premier League in Nagpur
1/7

खो खो हा क्रीडा प्रकार मृतावस्थेत चालला होता. परंतु, मागील काही वर्षात या खेळाकडे बघण्याचा सरकारचा आणि खेळाडूंचा दृष्टीकोन बदलला आहे, असे उद्गार भारतीय खो-खो टीमचे माजी कर्णधार व एकलव्य पुरस्काराचे मानकरी योगेश मोरे यांनी काढले.
2/7

महाराष्ट्र क्रीडा मंडळाद्वारे नागपुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘एमकेएम खो-खो प्रिमियर लीग – 2024’चे शुक्रवारी भारतीय खो-खो टीमचे माजी कर्णधार व एकलव्य पुरस्काराचे मानकरी योगेश मोरे यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून व ध्वजारोहण करून उद्घाटन करण्यात आले.
3/7

न्यू इंग्लिश हायस्कूल, कॉंग्रेस नगर येथील मैदानावर झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला डीएक्सेल डिव्हाईस प्रा. लि. चे संचालक प्रविण खंगार, नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, विदर्भ खो-खो संघटनेचे अध्यक्ष सुहास पांडे, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य प्रशांत कोठे, खासदार क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे सदस्य प्रकाश चांद्रायण, महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुमंत चितळे, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. विजय दातारकर, सचिव डॉ. पद्माकर चारमोडे, सहसचिव डॉ. संजय चौधरी यांची उपस्थिती होती.
4/7

खो-खो खेळाने नवी दिशा घेतली असून तो अधिक गतीमान झाला आहे, असे सांगताना योगेश मोरे यांनी आता अनेक खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची तसेच नोकरीच्या संधीही मिळू लागल्या आहेत, असे ते म्हणाले. अतिशय सुंदर आयोजनाबद्दल योगेश मोरे यांनी आयोजकांचे अभिनंदन केले व नियमितपणे प्रिमियर लीग आयोजित केल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
5/7

खो-खो प्रिमियर लीगमध्ये एमकेएम डिफेंडर्स, राजमुद्रा वॉरियर्स, आर्यास फायटर्स,किंग्ज छत्रपती, व्हिडीएल फ्लायर्स आणि स्पोर्ट्स कर्मा हे सहा संघ सहभागी झाले असून सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात या संघांनी मार्च पास केला. रेग्रीट टांगलो यांनी खेळाडूंना खेळापती निष्ठा व समर्पणाची शपथ दिली. अमीत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. सहाही संघांच्या ओनर्सचा सत्कार करण्यात आला.
6/7

रवींद्र फडणवीस यांनी सुरुवातीला खेळाडू, पालक व संघाचे ओनर्स यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, खो खो मृतावस्थेत जाणारा खेळ होता. पण मागील वर्षीपासून विविध स्पर्धांचे आयेाजन करणा-या महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे त्यासाठी अभिनंदन केले. आरएस मुडले इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
7/7

डॉ. पद्माकर चारमोडे यांनी प्रास्ताविकातून खो-खो प्रिमीयर लीगच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. आभार प्रदर्शन डॉ. संजय चौधरी यांनी केले. या आयोजनासाठी महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या सर्व सभासदांनी सहयोग आणि सहकार्य लाभले आहे.
Published at : 08 Nov 2024 11:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
सांगली
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
