एक्स्प्लोर

Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. यावरून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीय.

शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) जोरदार मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे. विधानसभेच्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) महाविकास आघाडीपासून वेगळा होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील, असे खळबळजनक वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. 

आज रामदास कदम यांनी शिर्डी येथे साईबाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रामदास कदम म्हणाले की, मी साईंचा भक्त आणि सेवक आहे. साईबाबा मला नेहमी बोलावतात. विधानसभा निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं असून पुढील दोन दिवसात सरकार स्थापन होणार आहे. साईबाबांनी चांगला कौल महायुतीला दिलाय. एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले. ज्या पद्धतीने अडीच वर्षात लोकाभिमुख निर्णय महायुती सरकारने घेतले त्याच पद्धतीने चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत, असे साकडे मी साईंना घातले आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यवधीचा निधी येईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

रामदास कदम पुढे म्हणाले की, मी तुम्हाला पुढचं भविष्य सांगतो. एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या फॅमिलीला घेऊन देश सोडून जातील, असे माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी बेईमानी केली, शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी जे पाप केलंय, त्या पापाचं प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल, अशी टीका त्यांनी केली. 

भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोठी जो निर्णय घेतील, त्यास माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. याबाबत रामदास कदम म्हणाले की, 18 ते 20 तास महाराष्ट्रात जनतेचे काम करणारा मुख्यमंत्री पहिलाच आहे. ते म्हणजे एकनाथ शिंदे. मागच्या वेळी आमचा आकडा कमी असतानाही आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली. आता भाजपचे 132 आमदार आहेत. त्यामुळे आम्ही किती मागावे, काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे. आम्हा सर्वांचीच इच्छा आहे की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. त्यांना देखील त्यांचा पक्ष चालवायचा आहे , त्यामुळे भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. कुठलाही मतभेद आमच्यात नसेल, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा 

Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?

महत्त्वाच्या बातम्या

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही

व्हिडीओ

Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Embed widget