एक्स्प्लोर

Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कारचा भीषण अपघात; उभ्या गाडीला भरधाव ट्रकने दिली मागून धडक

Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली असून यात कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

Nana Patole Car Accident : काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी नाना पटोले हे आपला सुनिश्चित प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या उभ्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवाने मोठी घटना टळली आहे. तर नाना पटोले हे देखील थोडक्यात बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पुढील अधिक तपास सुरू केलाय. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचे ट्रकवरील नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात जोरदार प्रचार आणि मतदारांच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. दरम्यान, काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास नाना पटोले हे  भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ आले असता, या ठिकाणी मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकीने गाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने यात नाना पटोलेंना कुठलीही दुखापत न झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळाताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या अपघातानंतर सध्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क आणि शंका निर्माण केल्या जात आहेत.     

25 वर्षानंतर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार

काँग्रेस पक्षानं भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून डॉ.प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. मागील पंचवीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काँग्रेसची इतर घटक पक्षासोबत आघाडी राहत असल्यानं इथं राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार उभा राहत होता. मात्र तब्बल 25 वर्षानंतर भंडारा-गोंदिया लोकसभेवर काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर उमेदवार यावर्षी उभा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं असून येथील उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे हे आता प्रचारासाठी प्रत्येक गावात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक गावात सभा, बैठका घेऊन मतदारांना मतदान करण्याचा आव्हान त्यांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच  कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या या प्रचारार्थ त्यांच्यासोबत बघायला मिळत आहे. 25 वर्षानंतर काँग्रेसचा उमेदवार इथे भरघोस मताने निवडून येईल, असा विश्वासही महायुतीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलाय.

महत्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावरRaj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP MajhaAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : सना मलिकांना उमेदवारी कशी मिळाली? Nawab Malik ExclusiveYogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Embed widget