एक्स्प्लोर

सिद्धिविनायक मंदिरात शॉर्ट्स, स्कर्टला विरोध म्हणजे महिलांवर अन्याय, सदावर्तेंच्या मुलीची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार

Zen Sadavarte on Siddhivinayak temple Dress Code : सिद्धिविनायक मंदिरात महिलांना लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोड विरोधात सदावर्तेंच्या मुलीची महिला आयोगाकडे तक्रार

Zen Sadavarte on Siddhivinayak temple Dress Code : वकील गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने  मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाची राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार केली आहे. "महिलांनी स्कर्ट, शॉर्ट्स घालून सिद्धिविनायक मंदिरात येऊ नये, असे म्हणणे महिलांसोबत अन्याय आहे. संविधानाच्या तरतुदींची पायमल्ली आहे", असं झेन सदावर्ते हिने तक्रारीत नमूद केलं आहे. 

झेन सदावर्ते तक्रारीत काय काय म्हणाली?

मी झेन सदावर्ते 12 वीत शिकत असून नॅशनल ब्रेवरी अवार्डची विजेती आहे. सिद्धिविनायक मंदिरात महिलांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. भक्तांवर लादण्यात आलेला हा ड्रेस कोड सामाजिकदृष्ट्या चुकीचा आणि भेदभाव करणारा आहे, असं माझं मत आहे. सिद्धिविनायक मंदिरात लागू करण्यात आलेला ड्रेस कोड मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. शिवाय, भारतासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आणि लोकशाही असलेल्या देशात सर्व नागरिकांना त्यांच्या श्रद्धांचे पालन करण्याची परवानगी असणे, आवश्यक आहे. कपडे घालण्यावरुन सार्वजनिक, धार्मिक ठिकाणी भेदभाव करणे चुकीचे आहे.  भक्तांनी त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा का घालाव्यात?श्रद्धेचा गाभा भक्तीमध्ये आहे, परिधान केलेल्या कपड्यात नाही. मी नम्रपणे विनंती करते की, ड्रेस कोडच्या नियमांचा पुन्हा एकदा विचार करण्यात यावा. मंदिर प्रशासनाने भेदभाव करणाऱ्या या नियमांबाबत सुधारणा केली पाहिजे. 

सिद्धिविनायक मंदिरात कोणते नियम लागू करण्यात आले होते? 

सिद्धिविनायक मंदिरातील प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी ड्रेस कोड लागू केला होता. मंदिरा प्रशासनाच्या मते, शॉर्ट कपडे, फाटलेले कपडे घालून येणाऱ्या भक्तांसाठी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यास परवानगी मिळणार नाही. भारतीय संस्कृतीत वेशभूषेला विशेष महत्त्व आहे. मंदिरात उचित कपडे घालून येणे, हे आपल्या भारतीयांची सभ्यता दर्शवणारे असते. त्यामुळे कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी जाताना सांस्कृतिक कपडे परिधान करायला हवेत. 

गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धिविनायक गणेश मंदिरात ड्रेस कोड लागू होणार आहे. तोकडे कपडे घालून येणाऱ्या भक्तांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नाहीये, याबाबतचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Govind Pansare : मोठी बातमी : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही? आज संध्याकाळपर्यंत सांगा, अन्यथा..; मनोज जरांगे पाटलांचं मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 29 January 2025 : ABP MajhaSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण; 50 दिवसांत काय झालं?Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणीABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget