Police Transfer : लोकसभेच्या निवडणुकीमुळे पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ द्या; अप्पर पोलीस महासंचालकांचं गृह विभागाला पत्र
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्यात यावी, असे पत्र अप्पर पोलिस महासंचालकांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना दिले आहे.

मुंबई : राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. पाचव्या टप्प्याचं (Mumbai Loksabha Election) मतदान 20 मेला होणार आहे आणि त्यानंतर चार जूनला निकाल जाहीर होणार आहे. तोपर्यंत राज्यात आचारसंहित लागू असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळे पोलिसांच्या बदल्यांना मुदत वाढ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांना मुदत वाढ देण्यात यावी, असे पत्र अप्पर पोलिस महासंचालकांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना दिले आहे.
पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या सर्व साधारण बदल्या एप्रिल मेमध्ये करणे आवश्यक आहे. मात्र सध्या लोकसभा निवडणूका पाहता, राज्यातील मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. तो पर्यंत आचार संहिता लागू राहणारत्या दरम्यान अधिकार्यांच्या सर्व साधारण बदल्यांची कार्यवाही करणे शक्य होणार नसल्याने मुदत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या बदल्यांसाठी 30 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे अप्पर पोलिस महासंचालक (आस्थापना)चे संजीव सिंघल यांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली आहे. मागणीप्रमाणे मुदत वाढ मिळते की नाही, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मुंबई पोलिसांंच्या सर्व सुट्ट्या रद्द
महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात आतापर्यंत चार टप्प्यात मतदान झाले. यानंतर पाचव्या टप्प्यासाठी 20 मे ला मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गृह खात्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. गृह खात्याने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत 20 मे रोजी मतदान होईल. यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघाचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पोलिसांची कमतरता पडू नये, यासाठी गृह खात्याने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा:
- Travel : रिमझिम पाऊस..निसर्गसौंदर्य अन् बेभान मन! पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं पाहाल, तर सगळं टेन्शन विसराल..
- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
- Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र येणार; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
