Mumbai Crime : भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाची फसवणूक, ट्रॉम्बे पोलिसांकडून तीन जणांविरुद्ध गुन्हा
Mumbai Crime : मुलीला एमबीबीएसची जागा मिळवून देण्याच्या बहाण्याने शास्त्रज्ञाची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Mumbai Crime News : भाभा अणुसंशोधन केंद्रातील (Bhabha Atomic Research Centre) एका शास्त्रज्ञाची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी (Trombay Police) तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बंगळुरूमधील केम्पेगोवाडा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये शास्त्रज्ञाच्या मुलीला एमबीबीएसची (MBBS) जागा मिळवून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, अमित कुमार अग्रवाल, राजकमल अग्रवाल आणि मन्सूर अली या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार 55 वर्षीय शास्त्रज्ञाच्या मुलीने 2018 मध्ये बारावीची परीक्षा पास केली होती. तिला एमबीबीएस करायचे होते. त्यांना बंगळुरू येथील कॉलेजबद्दल माहिती मिळाली. कॉलेजला भेट दिल्यानंतर त्यांना मॅनेजमेंट कोट्यात प्रवेशाचे आश्वासन देणारे आरोपी कॉलेज बाहेर भेटले आणि त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले
ट्रॉम्बे पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल
तक्रारदाराने एकूण 26.50 लाख रुपये आरोपींना दिले. परंतु फसवणूक झाल्याचे फिर्यादीला समजल्यानंतर त्याने परताव्याची मागणी सुरू केली. त्यावेळी आरोपीने अर्धी रक्कम परत केली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रातील एका शास्त्रज्ञाची 12.66 रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाविद्यालयात प्रवेश घेताना सतर्क राहा
सध्या वैद्यकीय आणि उच्च शिक्षणाकरता महाविद्यालयात अॅडमिशन मिळवून देण्याचा बनाव रचणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळी सक्रीय असल्याचे समजत आहे. पालकांकडून अनेकदा प्रवेशप्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्यामुळे प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली अनोळखी लोकांकडून विश्वास संपादन करून लाखो रुपयांपर्यंत फसवणूक केली जाते. विविध शहरात अनेक नावाजलेल्या संस्थांमध्ये मेडिकल, इंजिनीअरिंग, एमबीए कॉलेजमध्ये प्रवेश देतो सांगून फसवणूक झाल्याची उदाहरणे प्रवेशप्रक्रियेनंतर ऐकायला येतात. संधी साधून पालकांना हेरून आपली संस्थेच्या संचालक, सभासदाबरोबर थेट ओळख असल्याचे सांगून थेट प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही व्यक्ती भुरळ पाडतात. प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांकडून मूळ कागदपत्रे काढून घेतली जातात. प्रवेशाच्या नावाखाली लाखोरुपयांची मागणी केली जाते. मुलामुलींच्या शिक्षणासाठी साठविलेल्या पैशाची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येकाने जागरूक आणि सजग राहायला हवे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare UNCUT: संजय राऊत यांची भेट, फडणवीस - सोमय्यांवर हल्लाबोल; सुषमा अंधारे भाजपवर गरजल्या