लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईत पुन्हा रोकड सापडली, दादरमध्ये पांढऱ्या कारमध्ये 500 च्या नोटांची करकरीत बंडलं सापडली
Mumbai Cash Seized: दादरच्या शिंदे वाडी परिसरत लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीत एका वाहनात ही रक्कम आढळली.
![लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईत पुन्हा रोकड सापडली, दादरमध्ये पांढऱ्या कारमध्ये 500 च्या नोटांची करकरीत बंडलं सापडली Lok Sabha Election Cash Seized Election Commission in Dadar bundle of Rs 500 notes was found in a white car Marathi News लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईत पुन्हा रोकड सापडली, दादरमध्ये पांढऱ्या कारमध्ये 500 च्या नोटांची करकरीत बंडलं सापडली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/57f0c80f0db1438ec2ec3bd527eb55fe171437243994889_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Cash Seized: लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता देशभरात सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर बेकायदेशीर रक्कम बाळगण्यावर आहे. दादरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दादरमध्ये निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. दादरच्या शिंदे वाडी परिसरत लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जवळपास 1 लाख 80 हजार रुपयांची ही रोख रक्कम होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीत एका वाहनात ही रक्कम आढळली.
समोर आलेल्या माहितीनुसार, दादरच्या शिंदे वाडी परिसरात एक कारमध्ये 1 लाख 80 हजाराची रोकड निवडणूक भरारी पथकाने भोईवाडा पोलिसांच्या मदतीन जप्त केली. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता गाडीत 1 लाख 80 हजारची रोकड होती. या पैशांबाबत चालकाकडे कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने पोलिसांनी निवडणूक भरारी पथकाच्या मदतीने कारवाई केली आहे.
मुंबईलगतच्या शहरांमधील एन्ट्रीवर नाकाबंदी
निवडणूक काळात पैशांच्या अवैध वाहतुकीवर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मुंबईत राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून तसेच बाहेरील राज्यांमधून दररोज अनेक गाड्यांची वाहतूक होत असताे. त्यातूनही पैशांची वाहतूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांमधील एन्ट्रीवर नाकाबंदी करण्यात आली असून गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मतदानाच्या आधीचे चार दिवस हे अतिशय महत्त्वाचे असून, या दिवसांत सुरक्षा दलाची कुमक वाढवली जाणार आहे.
निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी तपासणी
निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. मतदारांना भुलवण्यासाठी याचा वापर केला जातो. ते रोखण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारले जातात आणि संशयित वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जाते. रस्ते वाहतुकीमार्फत होणारी पैशांची ने-आण रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरवेळी निवडणुकीत हे प्रकार समोर येत असतात.
हे ही वाचा :
Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग अलर्ट मोडवर! 4600 कोटी रुपये, कोट्यवधींची दारू जप्त
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)