एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Abhishek Ghosalkar: आता मैत्रीचा नवा अध्याय सुरू करू, वाक्य संपण्यापूर्वीच घोसाळकरांवर फायरिंग, मॉरिसने जुना राग काढला, दोघांचाही गेम झाला!

Abhishek Ghosalkar: फेसबुक लाईव्ह दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर मुंबई हादरली. चार मिनिटांच्या लाईव्हनंतर उठून हसत बाहेर येत असताना त्यांच्यावर एका मागोमाग एक अशा पाच गोळ्या झाडल्या.

मुंबई :  मुंबईतील दहिसर (Mumbai Dahisar Firing)  परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)  यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित नेत्याने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. घोसाळकर आणि नोरोन्हा काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. तब्बल 40 मिनिटं हे फेसबुक लाईव्ह चाललं. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तुल काढलं, आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. गोळीबारामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

फेसबुक लाईव्ह दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर मुंबई हादरली. चार मिनिटांच्या लाईव्हनंतर उठून हसत बाहेर येत असताना त्यांच्यावर एका मागोमाग एक अशा पाच गोळ्या झाडल्या. मैत्रीचा नवा अध्याय सुरु करू म्हणाऱ्या मॉरिसने केलेला प्रकारअवघ्या महाराष्ट्राने घडलेला प्रकार लाईव्ह बघितला आहे. मॉरिसने आयोजित केलेल्या साडी वितरण कार्यक्रमात घोसाळकर आले होते. आमच्यातील गैरसमज दूर झाले आणि आम्ही एकत्र आलो आहे हे सांगण्यासाठी फेसबुक लाईव्ह करण्यात आले. 

"आज अनेक लोक सरप्राईज होतील"

चार मिनिटाच्या फेसबुक लाईव्हमध्ये हा प्रकार घडला आहे. फेसबुक लाईव्हची सुरुवात मॉरीसने गॉड ब्लेस यू असे म्हणत घोसाळकरांना बोलण्यास सांगतो.घोसाळकर म्हणाले, आज मॉरिस भाईंसोबत लाईव्ह येण्याची संधी मिळाली अनेक जण सरप्राईज झाले असतील. घोसाळकरांच्या लाईव्हमध्ये येत "आज बहोत लोद सरप्राईज होगे" असे म्हणाला. तसेच काही गोष्टी चांगले काम करण्यासाठी होतात असे म्हणत पुन्हा घोसाळकरांना बोलण्याचा आग्रह केला. घोसाळकर पुढे म्हणाले, एक चांगली दिशा घेऊन आम्ही पुढे जात आहे. मुंबई- नाशिक बस प्रवास सुरू करणार आहे. नवीन संकल्प घेत एकत्र काम करणार आहेत. आमच्या आणि कार्यकर्त्यामध्ये काही गैरसमज होते. मात्र आता आम्ही एकत्र काम करणार असे म्हणत बोलून उठून जात असताना त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. 

नेमंक काय घडल? (What Happend In Facebook Live) 

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे दोघं तब्बल 40 मिनिटं एकत्र फेसबुकवर लाईव्ह गप्पा मारत बसले होते. फेसबुक लाईव्ह जेव्हा संपत आलं, तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्यानं पिस्तुल काढलं आणि पुन्हा खोलीत शिरून त्यानं अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरण्याच्या आत ते जमिनीवर कोसळले. अभिषेक घोसाळकरांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रियाही सुरू झाली. पण अतिरक्तस्त्रावानं त्यांचा मृत्यू झाला. 

महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय? (Maharashtra Crime) 

महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडतायत. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची आधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवळ्या, भर रस्त्यात हत्या केली. मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची आज हत्या करण्यात आली. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Embed widget