Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 25 जून 2022 : शनिवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. शिंदे गटातल्या सोळा बंडखोरांना अपात्रतेबाबत नोटीस पाठवणार, 48 तासांत नोटीशीला उत्तर द्यावं लागणार, विधानसभा उपाध्यक्षांशी चर्चेनंतर निर्णय
2. शेवटपर्यंत सरकार टिकवणारच, शरद पवारांचा विश्वास, मातोश्रीवरील बैठकीत विश्वासदर्शक ठरावापासून सर्व रणनीतीवर खलबतं...
3. आगामी पालिका निवडणुका भगव्या रंगातच लढू, शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत आदित्य ठाकरेंचा निर्धार...
4. मतदारसंघामध्ये मेळावे आणि बैठका घ्या, एकनाथ शिंदे यांचे बंडखोर आमदारांना आदेश, कायम शिवसेनेतच राहणार, बंडखोर आमदार योगेश कदम यांचं ट्विट
5. शिवसेनेतील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती तर मुंबईत भाजपची खलबतं
6. भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवतेय, गुवाहाटीच्या योग शिबिरात सर्वच बाबतीत अंधकार, सामनातून हल्लाबोल
Shiv Sena Saamana on BJP : गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशात आज सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवाय एकनाथ शिंदेंना बाबा 'योगराज' असं संबोधत त्यांच्यावरही टीकेची झोड उठवली आहे. गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे, अशी टीका लेखात करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा 'योगराज' हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत. एक मात्र नक्की, गुवाहाटीच्या योग शिबिरामुळे देशातला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे. एनकेनप्रकारे सत्ता स्थापन करायचीच, माणसे फोडायची, विकत घ्यायची, आमदारांचा बाजार भरवायचा या प्रवृत्तीविरोधात देश एकवटत आहे. त्यातूनच नव्या लढ्याची तेजस्वी किरणे बाहेर पडतील. जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते, पण गुवाहाटीच्या योग शिबिरात सर्वच बाबतीत अंधकार आहे, असंही लेखात म्हटलं आहे.
7. लोकलमध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्याबाबत सरकार विचाराधीन, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा, कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही खलबतं
8. राज्यात पुढील ५ दिवस पावसाचा इशारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधारेचा अंदाज तर मुंबईत सोमवारपासून १० टक्के पाणीकपात
9. कोरोनाप्रमाणेच Monkeypox लाही जागतिक आणीबाणी घोषित केली जाणार? WHO ने बोलावली आपत्कालीन बैठक
10. जागतिक स्तरावर भारतीय फुटबॉल टीमची अप्रतिम कामगिरी, फिफा रँकिंगमध्ये टीम इंडियाला फायदा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
