एक्स्प्लोर
चोरी केल्याचा पश्चाताप, चूक कबूल करुन अल्पवयीन मुलाने जीवन संपवले
सांगलीच्या पाटणे प्लॉटमध्ये शुभम व्हनखंडे राहत होता. तो राममंदिर चौकातील एका बेकरीमध्ये कामाला होता. त्याच बेकरीमध्ये त्याने आपल्या मित्रासोबत 1 नोव्हेंबर रोजी चोरी केली होती. या प्रकरणी सांगली शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
![चोरी केल्याचा पश्चाताप, चूक कबूल करुन अल्पवयीन मुलाने जीवन संपवले Theft Guilty, After confessing the mistake, the younger boy ended his life in Sangli चोरी केल्याचा पश्चाताप, चूक कबूल करुन अल्पवयीन मुलाने जीवन संपवले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/11/08185656/sangli-suicide.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली: चोरी केल्याचा पश्चाताप पश्चाताप झाल्यामुळे एका अल्पवयीन मुलाने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली. राहत्या घरात गळफास घेऊन शुभम व्हनखंडे (वय 16) या मुलाने आत्महत्या केली. शुभम व्हनखंडे आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली. यात चोरीची कबुली आणि चूक झाल्याचे त्याने लिहिले आहे.
सांगलीच्या पाटणे प्लॉटमध्ये शुभम व्हनखंडे राहत होता. तो राममंदिर चौकातील एका बेकरीमध्ये कामाला होता. त्याच बेकरीमध्ये त्याने आपल्या मित्रासोबत 1 नोव्हेंबर रोजी चोरी केली होती. या प्रकरणी सांगली शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी गुरुवारी शुभम व त्याच्या मित्रास ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यानंतर पोलिसांनी शुभमला पुढील चौकशीसाठी गुरुवारी येण्यास सांगून सोडून दिले होते.
शुभम याने आपले घर गाठत आपल्या दुकान मालकास फोनवरून आपली चूक झाली, माफ करा असे सांगतिले. घरी कोणी नसताना बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी शुभम याने एक चिठ्ठी लिहली असून यात त्याने आपल्याला पैशांची गरज होती. त्यामुळे आपण दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असा मजकूर लिहिला आहे. पोलिसांना ही चिठ्ठी घटनास्थळी सापडली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)