एक्स्प्लोर
Shiv Jayanti 2025 : 'जय भवानी, जय शिवराय'च्या गर्जनेने दुमदुमली उपराजधानी; महालाच्या शिवतीर्थावर शिवभक्तांची मांदियाळी
Shiv Jayanti 2025: संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या हर्ष-उल्हासात साजरी करण्यात येत आहे. तोच उत्साह आज नागपुरात देखील बघायला मिळाला आहे.

Shiv Jayanti 2025
1/7

संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या हर्ष-उल्हासात साजरी करण्यात येत आहे. तोच उत्साह आज उपराजधानी नागपुरात देखील बघायला मिळाला आहे.
2/7

दरवर्षीप्रमाणे यंदा ही नागपुरातील 'शिवतीर्थ' छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, महाल नागपूर येथे पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
3/7

दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भारत पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी इत्यादीसह इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
4/7

सर्व अधिकारी, प्रशासन या रॅलीमध्ये सहभागी झाले. या ठिकाणी आपले जीवन समर्पित करण्यासाठी जनता रस्त्यावर आलेली आहे. नागपूरसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे, अशी प्रतिक्रिया नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
5/7

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हीच खरी प्रेरणा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि विचार घेऊन पुढे जाणारे लोक आपण आहोत. असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
6/7

देशात योग्यरीतीने काम करण्याची ऊर्जा आजच्या दिवशी मिळते, ही ऊर्जा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
7/7

शहारातील श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवतीर्थ यथे साजरी करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे अवघी उपराजधानी छत्रपतींच्या जयजयकाराने दुमदुमली असल्याचे बघायला मिळाले.
Published at : 19 Feb 2025 01:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
