एक्स्प्लोर

Swatantra Veer Savarkar : सावरकरांना फर्ग्युसनच्या वसतिगृहातून काढून टाकलं, त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

सन1905 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांना वसतिगृहाच्या खोलीतून तत्कालीन प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी का काढून टाकलं होतं? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

Swatantra Veer Savarkar : आज देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी केली जात आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर वास्तव्यास होते. सन 1902 ते 1905 या कालावधीत सावरकर या वसतिगृहातील खोली क्रमांक 17 मध्ये वास्तव्यास होते. ती खोली दरवर्षी जयंतीनिमित्त दर्शनासाठी खुली करण्यात येते. या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचं जतन देखील करण्यात आलं आहे. या खोलीचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकांचं वेगळं नातं होतं. त्याकाळी या खोलीत राहून त्यांनी अनेक काव्यं लिहिली आणि अनेक मोहिमांची किंवा चळवळींची सुरुवात देखील केली आहे. मात्र 1905 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना या खोलीतून महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी का काढून टाकलं होतं? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचाच आढावा...

Swatantra Veer Savarkar : शिक्षणासाठी नाशिक ते पुणे प्रवास...

1902 साली शिक्षणासाठी नाशिक शहरातून स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यात आले होते. पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि याच महाविद्यालयात त्यांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. इ.स. 1902 ते इ.स 1905 सालापर्यंत ते फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतीगृहाच्या 17 नंबरच्या खोलीमध्ये राहत होते. या खोलीत वि.म. भट हे त्यांचे सहकारी होते. ते अभिनव भारतपासून त्यांच्यातसोबत होते आणि त्याचे नातेवाईकदेखील होते. भट यांनी सावरकर आणि अभिनव भारत यांच्यावर पुस्तकदेखील लिहिलं आहे. 

Swatantra Veer Savarkar : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर सावरकरांचा मोठा प्रभाव

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यावेळी 'सावरकर कॅम्प' नावाचा त्यांचा गट होता आणि महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी या सावरकर कॅम्पमध्ये सामील झाले होते. या कॅम्पमध्ये अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. लोकमान्य टिळकांचे सुपुत्र विश्वनाथ पंत टिळक, शि.म. परांजपे यांचे सुपूत्र कृ.शि. परांजपे यांचा समावेश होता. सावरकर हे टिळकांना आणि परांजपे यांना गुरुस्थानी मानायचे, त्यांचे सुपुत्र सावरकर यांच्या कॅम्पमध्ये दाखल झाले होते. त्यांचं प्रभावशाली व्यक्तीमत्व आणि कामाची पद्धत पाहून अनेक विद्यार्थीदेखील यात आनंदाने सहभागी झाले होते. 

Swatantra Veer Savarkar : महाविद्यालयीन जीवन, काव्य लेखन अन् चळवळीला सुरुवात...

फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकर खऱ्या अर्थाने महाविद्यालयीन जीवन जगले. सकाळी 300 जोरबैठकांपासून ते अभ्यास आणि काव्यलेखनदेखील त्यांनी याच महाविद्यालातील खोलीत केलं. महाविद्यालयात असताना अनेक सहकाऱ्यांसोबत सावरकर सिंहगडावर गेले होते. त्यावेळी त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा बघितला. त्यांचा इतिसाहाचा दांडगा अभ्यास होताच. त्यावेळी त्यांनी सिंहगडावरुन परत आल्यानंतर तानाजी मालुसरे यांच्यावर काव्य रचण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी काव्य न रचता पोवाडा रचला होता. त्यालाच सिंहगडाचा पोवाडा, असं म्हटलं जातं. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे य़ांचा पोवाडा, प्रसिद्ध 'जयोत्सुते' हे काव्य रचलं.

Swatantra Veer Savarkar : सावकरांना क्रिकेटऐवजी फुटबॉल आवडायचा...

या महाविद्यालयात ज्याप्रमाणे त्यांची काव्य प्रतिभा स्फुरली त्याचप्रमाणे त्यांनी खेळांनादेखील प्राधान्य दिलं होतं. रोज व्यायाम आणि पुण्यातील टेकड्या फिरणं हा सावरकरांचा दिनक्रम असायचा. या महाविद्यालयात असताना सावरकर खेळांमध्येदेखील सहभागी व्हायचे. क्रिकेट नाही तर त्यांना फुटबॉल खेळायला जास्त आवडत होतं. हेच नाही तर 1902 मध्ये याच महाविद्यालयात 'त्राटिका' नावाचं नाटक केलं होतं. या नाटकात त्यांनी मुख्य भूमिका नव्हती. त्यावेळी आर्यभूषण नाट्यगृहात प्रयोग झाला होता, अशी सावरकर चरित्रात नोंद सापडते. मात्र त्यानंतर 1903 आणि 1904 साली शेक्सस्पिअरचं 'अथेल्लो' नाटकाचं मराठी भाषांतर केलं होतं आणि 'झुंजारराव' असं या नाटकाचं नाव ठेवलं होतं. या नाटकात 'अयागो' नावाच्या खलनायकची भूमिका निभावली होती. त्यावेळी त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. 

Swatantra Veer Savarkar : स्वदेशी चळवळीला सुरुवात...

1905 साजी वंगभंग आंदोलन देशभर पेटलं होतं. स्वदेशी मालाचा वापर करा, अशी मोहीम याच काळात सुरु झाली होती. पुण्यात 1905 साली प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक सभेच्या ठिकाणी न. चि. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या विद्यार्थ्यांची सभा झाली. स्वदेशी कपड्यांना किंवा मालाला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र आणत या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत सावरकरांनी भाषण केलं होतं आणि त्यात स्वदेशी मालाला प्रोत्साहन देण्यासाठी विदेशी मालावर बहिष्कार घालणं आवश्यक असल्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर विदेशी कपड्यांची होळी पेटवण्याचा प्रस्ताव विद्यार्थ्यांसमोर मांडला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 

Swatantra Veer Savarkar : होळी करा शेकोटी नको; लोकमान्यांचा सल्ला

लोकमान्य टिळक कामानिमित्त पुण्यात नव्हते. ज्यावेळी ते पुण्यात आले त्यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली आणि त्यांना विदेशी कपड्यांची होळी करण्याची कल्पना सांगितली. त्याचवेळी लोकमान्यांनी त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र भरपूर प्रमाणात विदेशी कपडे गोळा करुनच होळी करा, असं देखील त्यांनी सावरकरांना सांगितलं होतं. विदेशी कपड्यांची होळी करा शेकोटी नको, असं लोकमान्य टिळक म्हणाले होते. त्यावेळी महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि सावरकर यांच्या सहकाऱ्यांनी भरपूर प्रमाणात विदेशी कपडे गोळा केले होते आणि पुण्यातील काही परिसरातून या कपड्यांची मिरवणूक काढली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर 1905 साली होळी पेटवली. त्याच ठिकाणी जळत्या होळी समोर रसरसतं भाषणं केलं. त्यावेळी लोकमान्य टिळक यांनीदेखील भाषण दिलं होतं. याच होळीची धग इंग्लंडपर्यंत पोहचली होती. त्यानंतर नाशिकमध्येही विदेशी कपड्यांची होळी केली होती. या चळवळीला देशव्यापी स्वरुप आलं होतं. 

Swatantra Veer Savarkar : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातून त्यांना का काढून टाकण्यात आलं?

या संपूर्ण घटनेचे परिणाम सावरकर यांच्यावर झाले. सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते. त्यावेळी तत्कालीन प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून काढून टाकलं होतं आणि त्यांना दहा रुपये दंडदेखील आकारला होता. मात्र सावकरांच्या सहकाऱ्यांनी यापेक्षा जास्त रक्कम गोळा करुन सावरकरांना दंड म्हणून भरायला लावली होती. या संपूर्ण घटनेनंतर लोकमान्य टिळक आक्रमक झाले आणि त्यांनी केसरी वृत्तपत्रात 'हे आमचे गुरु नव्हे' या नावाचे लेख लिहिला. या लेखातून सावरकर यांना आकारण्यात आलेल्या दंडाचा त्यांनी तीव्र निषेध केला होता. त्यानंतर आज या होळीच्या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक बांधण्यात आलं आहे.

(वरील संपूर्ण माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक आणि लेखक अक्षय जोग यांनी दिली आहे)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget