Kunal Kamra & Eknath Shinde: कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई, दोन नेत्यांना चौकशीलाही बोलावलं
kunal kamra & Eknath Shinde: कुणाल कामराची एकनाथ शिंदेंवर तिरकस टीका. शिवसैनिक कमालीचे आक्रमक. एकनाथ शिंदेंची जाहीर माफी मागा नाहीतर रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा.

मुंबई: स्टँडअप कॉमेडिनय कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. कुणाल कामराचा (Kunal Kamra) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिवसैनिक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कुणाल कामराचा शो झालेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली होती. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून शिवसैनिकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
खार येथील स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी कुणाल सरमळकर, राहुल कनाल यांच्यासह शिवसेना कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुणाल कामरा प्रकरणात कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांना खार पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. एकनाथ शिंदे संदर्भात विडंबनात्मक गाणं गायल्यानंतर कुणाल कामाराच्या विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. आता पोलीस कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल चौकशीसाठी आल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करणार, हे बघावे लागेल. या सगळ्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार, हेदेखील बघावे लागेल.
कुणाल कामरा नेमकं काय म्हणाला?
कुणाल कामरा याने त्याच्या स्टँडअप स्कीटमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीवर तिरकस भाष्य केले होते. कुणाल कामराने एक विडंबनात्मक चारोळी यावेळी साद केली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा अप्रत्यक्षपणे 'गद्दार', 'दलबदलू', असा उल्लेख करण्यात आला होता. यावरुन शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. एकनाथ शिंदे यांनी घराणेशाही संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा बापच चोरला. उद्या मी सचिन तेंडुलकरच्या मुलाला भेटेन, त्याच्या वडिलांविषयी चार चांगल्या गोष्टी बोलेन आणि सचिन तेंडुलकर आता माझे वडील आहेत, असे म्हणेन, तर ते चालेल का?, असे कुणाल कामराने ट्विटमध्ये म्हटले आहे.
दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू; शिवसैनिकांचा कुणाल कामराला अल्टिमेटम
कुणाल कामराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यामधील एकनाथ शिंदे यांच्याविषयीची भाषा पाहून शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. कुणाल कामराला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी. त्याचसोबत कुणाल कामराला दोन दिवसाचा आत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माफी मागावी, अन्यथा कुणाल कामराला मुंबईमध्ये फिरू देणार नसल्याच्या इशारा मुरजी पटेल यांच्याकडून देण्यात आला होता.
आम्ही कामराविरोधात एफआयआर दाखल केला आहे आणि डीसीपीकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. कामरा यांनी दोन दिवसांत माफी मागितली नाही, तर तो जिथे दिसेल तिथे शिवसैनिक त्याचं तोंड काळं करतील, असेही मुरजी पटेल यांनी म्हटले.
आणखी वाचा
आधी कुणाल कामराने खिल्ली उडवली, मग संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळणारं ट्विट केलं, नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

