मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Nagpur Violence : नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या शहराध्यक्ष फहीम खान याच्या घरावर आता बुलडोजर चालणार असल्याची माहिती पुढे येत आहे

Nagpur Violence : नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी फहीम खान (Faheem Khan)याचा बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या शहराध्यक्ष फहीम खान याच्या घरावर आता बुलडोजर चालणार असल्याची माहिती पुढे येत आहे. फहीम खान याने नागपूरच्या (Nagpur Violence) टेकानाका परिसरात घर बांधतांना काही भागात अतिक्रमण केलंय. आता नागपूर महानगर पालिकेने त्याच्या कुटुंबाला नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी फहीम खानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
घर बांधतांना अतिक्रमण, सरकारकडून बुलडोझर चालवणार?
नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून (FIR) आलेल्या माहितीनुसार, फहीम खान हा या हिंसाचारातील मास्तर माईंड असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या दिवशी फहीम खानने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. परिणामी जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप करत नागपूर हिंसाचारातील म्होरक्या फहीम खानच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असताना आता नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे फहीम खानला आणखी एक मोठा धक्का प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, उबाठा गटाची मागणी
दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागपूरचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी केली आहे. हिंसाचारात अनेक निर्दोष लोकांना पोलीसांनी आरोपी म्हणून अटक केली आहे. त्याची सत्यता तपासली जावी, यासाठी न्यायालयीन चौकशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात आहे.
नागपूर सावरतंय, जनजीवन पूर्ववत
नागपूरच्या संचारबंदी असलेल्या सर्व भागातून संचारबंदी काल दुपारी तीन वाजल्यापासून पूर्णपणे उठवली आहे. त्यामुळे महाल, छत्रपती शिवाजी चौक, चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा, हंसापुरी या सर्व भागांमध्ये आता सामान्य लोकांचे जीवन पूर्ववत होताना दिसून येत आहे. यात लहान मुलं हसत खेळत शाळेत जात आहेत, छोटे व्यवसायिक आपला व्यवसाय सुरू करताना दिसत आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिला सकाळच्या मॉर्निंग वॉकसह घरगुती साहित्य घेताना दिसून येत आहेत. ऑटो चालकांची लगबग दिसून येत आहे. मात्र कारण नसताना कुठलाही दोष नसताना हिंसेमुळे आम्ही बरंच काही गमावलं, अशी भावना प्रत्येकांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे वर्षानुवर्षे या भागात राहणाऱ्यांचा स्पष्ट म्हणणं आहे की हिंसेच्या वेळेला दिसून येणारे चेहरे स्थानिक नव्हते, ते बाहेरचे होते. असेही मत त्यांनी व्यक्त केलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

