एक्स्प्लोर

Chhaava Box Office Collection Day 38: फक्त काही पावलं अन् 'छावा' बॉलिवूडचा किंग; सर्वात मोठ्या रेकॉर्डपासून 2 कोटी दूर, एकूण कमाई किती?

Chhaava Box Office Collection Day 38: सहाव्या आठवड्यात 'छावा'नं ज्या प्रकारे आपली कमाई वाढवली आहे. विक्की कौशलचा हा चित्रपट एक-दोन दिवसांत आपल्या नावावर बॉलिवूडचा सर्वात मोठा रेकॉर्ड रचणार, यात काही शंका नाही.

Chhaava Box Office Collection Day 38: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटानं सहाव्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. आजच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट'पेक्षा दररोज जास्त कमाई करून 'छावा' (Chhaava) बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे.

व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाचा काल बॉक्स ऑफिसवर 38 वा दिवस होता. 'छावा'च्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात...  

'छावा' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि पाच आठवड्यात हिंदीमध्ये एकूण 571.40 कोटी रुपये कमावले. आणि दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'छावा'च्या तेलुगू आवृत्तीनं 14.41 कोटी रुपये कमावले. या चित्रपटानं 36 व्या आणि 37 व्या दिवशी अनुक्रमे 2.1 कोटी आणि 3.7 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे एकूण 591.61 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

38 व्या दिवशी, म्हणजे आज सकाळी 10:35 वाजता, 'छावा'ची कमाई 4.34 कोटींवर पोहोचली. अशाप्रकारे, चित्रपटाचं एकूण कलेक्शन 595.95 कोटी रुपयांवर पोहोचलं. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.

View this post on Instagram
 
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

'छावा' आज दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 

सध्या, सर्वाधिक कमाई करणारे बॉलिवूड चित्रपट म्हणजे शाहरुख खानचा जवान (640.25 कोटी रुपये) आणि स्त्री 2 (597.99 कोटी रुपये). याचा अर्थ असा की, 'छावा' लवकरच स्त्री 2 च्या लाईफटाईम कलेक्शनचा टप्पा ओलांडणार आहे. अशातच आज 'छावा' हा धमाकेदार विक्रम मोडणार की, नाही, हे आज संपूर्ण आकडेवारी अपडेट झाल्यानंतर कळेल. 

'सिकंदर' नसता तर 'छावा'नं 'जवान'चा विक्रम मोडला असता

30 मार्च रोजी सलमान खानचा सिकंदर चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असल्यानं, 'छावा'चे शो कमी होतील आणि चित्रपटाच्या कमाईतही मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा सर्वाधिक कलेक्शन रेकॉर्ड मोडणं 'छावा'साठी अशक्य होईल. जर 'सिकंदर' प्रदर्शित झाला नसता आणि 'छावा' ला आणखी काही वेळ मिळाला असता, तर विक्की कौशलचा चित्रपट 'जवान'च्या आसपास नक्कीच पोहोचली असती. 

दरम्यान, मॅडॉक फिल्म्सचा 'छावा' 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनली आहे. फिल्ममध्ये विक्की कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना व्यतिरिक्त डायना पेंटी, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बॉलिवूडचा 'राजा' होण्यापासून छावा फक्त दोन पावलं दूर, नंबर 1 बनण्यासाठी दोन सिनेमे सर करणं बाकी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget