एक्स्प्लोर
महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही : मुख्यमंत्री येडियुरप्पा
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर येडीयुरप्पांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. येडीयुरप्पा म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटकला कोणता भाग देण्यात आला. हे महाजन आयोगाने स्पष्ट केलं आहे. आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितल आहे.

मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादामध्ये एका माथेफिरू नेत्याने एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळी घालण्याची भाषा केल्यानंतर संपूर्ण सीमा भागात तणाव निर्माण झाला. अशातच कर्नाटकाचे मुख्यंत्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रालाआम्ही एक इंचही जमीन देणार नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर येडीयुरप्पांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. येडीयुरप्पा म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटकला कोणता भाग देण्यात आला. हे महाजन आयोगाने स्पष्ट केलं आहे. आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितल आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर येडीयुरप्पांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही या येडियुरप्पा यांच्या वक्तव्याचा प्राध्यापक आणि ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी समाचार घेतला आहे. येडियुरप्पा यांचे विधान दुर्दैवी असून त्यांच्या अधिकारात येत नाही. ते आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत मात्र निवाडा सुप्रीम कोर्टाने द्यायचा आहे. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार सीमाभागाचा प्रश्न आडमुठेपणाने दाबून धरत आहे, असं वक्तव्य प्रा. एन डी पाटील यांनी केलं आहे.
महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादामुळे कर्नाटकातल्या बेळगावात उद्धव ठाकरेंचा पुतळा जाळण्यात आला होता. त्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुप्पा यांचा पुतळा जाळत त्याला प्रत्युत्तर दिलं होत. या आंदोलनात हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचीही उपस्थिती होती. दुसरीकडे कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून कोल्हापुरात येणाऱ्या सर्व बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. कोल्हापूरच्या कागलमध्ये कन्नड नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटलांविरोधात तिरडी मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.No question of giving away even an inch of land: Karnataka CM B S Yediyurappa on #Belgaum dispute
— Press Trust of India (@PTI_News) December 30, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
क्राईम
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
