एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: विधानसभेपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवबंधन बांधलं, मोजून 5 महिन्यांनी दिनेश परदेशी पुन्हा भाजपच्या दिशेने

विधानसभेपूर्वी भाजपचे बडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉ दिनेश परदेशींनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 25 सप्टेंबर 2024 रोजी प्रवेश केला होता.

Chhatrapati Sambhajinagar: विधानसभा निवडणुकांच्या महिनाभरआधी भारतीय जनता पक्षातून उद्धव ठाकरेंचे शिवबंधन बांधणारे दिनेश परदेशी आता उद्धव सेनेला रामराम ठोकत पुन्हा घरवापसी करणार आहेत. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर मतदारसंघांसाठी लढलेल्या दिनेश परदेशींनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचं ठरवलं असून मोजून 5 महिन्यांनी ते आज (25फेब्रुवारी) भाजपात प्रवेश करणार आहेत. दिनेश परदेशी यांच्या प्रवेशासाठी कार्यकर्ते भल्या पहाटे वैजापूरहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. (Dinesh Pardeshi)

राज्यात विधानसभेनंतर सर्व राजकीय गणिते बदलली आहेत. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येणार अशी अटकळ बांधली जात होती. राज्यातील बहुतांश कल त्याबाजूनेच असल्याचे पहायला मिळाले.मात्र, मोठ्या संख्येने महायुतीच्या जागा राज्यात आल्याने महाविकास आघाडीला तोंडघशी पडावे लागले. दरम्यान, निवडणूकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंचं शिवबंधन बांधणारे दिनेश परदेशी आता पुन्हा भाजप प्रवेश करणार आहेत. (BJP)

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का 

विधानसभेपूर्वी भाजपचे बडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉ दिनेश परदेशींनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 25 सप्टेंबर 2024 रोजी प्रवेश केला होता. आता मोजून पाच महिन्यांनी म्हणजे 25 फेब्रुवारी 2025 ला ते भाजपात प्रवेश करणार आहेत. या प्रवेश सोहळ्याच्या अनुषंगाने मंगळवार पहाटेच डॉ दिनेश परदेशींचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.   

कोण आहेत दिनेश परदेशी?

2001 पासून ते जवळपास आतापर्यंत वैजापूर नगरपालिकेवर डॉ.परदेशींची एकहाती सत्ता राहिलीय. परदेशींनी काँग्रेसकडून यापूर्वी दोनदा विधानसभा लढवली आहे. या दोन्हीही निवडणुकीत परदेशींना अगदी थोडक्या मताने पराभवाच्या छायेत राहावे लागले आहे.तसेच शिंदेचे विद्यमान आमदार बोरनारे यांना आव्हान उभे करणाऱ्या उमेदवारांची यादीत दिनेश परदेशींचे नाव घेतले जाते.

राजकीय प्रवास

1)1996 -2001 : पासून नगर परिषद, वैजापूर निवडणूक लढवून उपाध्यक्षपदी पाच वर्ष निवड भारतीय जनता पार्टी

2) 2001 - 2006 :- पासून जनतेतून निवडणूक लढवून नगराध्यक्षपदी पाच वर्ष निवड नगर परिषद, वैजापूर

3) 2006 - 2011 :- पासून नगर परिषद निवडणूक लढवून नगराध्यक्ष पदी पाच वर्ष निवड.

4) 2011 - 2016 :- पासून नगर परिषद वैजापूर निवडणूक, दिनेश परदेशी यांच्या पत्नी  शिल्पा परदेशी यांची पाच वर्षांसाठी नगराध्यक्षा पदी निवड 

5) 2017 - पासून जनतेमधून दिनेश परदेशी यांच्या पत्नी  शिल्पा परदेशी यांची पाच वर्षांसाठी नगराध्यक्षा पदी निवड

6) 2009 - वैजापूर विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढविली 41227 मते मिळाली.

7) 2014  मध्ये दिनेश परदेशी यांनी काँग्रेस कडून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना  45346 मतं मिळाली पण त्यांचा पराभव झाला.  त्या निवडणुकीत शिवसनेच्या आर.एम. वाणी यांना 47405 मतं मिळाली होती. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगांवकर 52114 मतं मिळवत विजयी झाले होते. भाजपचे एकनाथ जाधव 24249 मतं मिळवत पराभूत झाले होते.  

8) 2018 पासून भारतीय जनता पार्टी संभाजीनगर लोकसभा सह संयोजक पदाची जबाबदारी

9) 1997 ते 2000 मध्ये  भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष

10) 2018 - पासून जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी संभाजीनगर

11) 2019 - पासून संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक औरंगाबाद जिल्ह्यात सार्वधिक मतांनी विजयी 

हेही वाचा:

Maharashtra Politics : थँक्यू मर्सिडिज! आरोप-प्रत्यारोपांचा गिअर्स जोरात, राजकारण्यांची सीक्रेट्स बाहेर 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget