Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचा विजय, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Eknath Shinde Tweet : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेची बंडखोर नेते एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Political Crisis : ठाकरे विरुद्ध शिंदे या सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. 16 बंडखोरांवर 12 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई विधानसभा उपाध्यक्षांना करता येणार नाही. न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेची बंडखोर नेते एकनाथ शिंदेनी दिली आहे. हा आमचा विजय नाही तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचा विजय असल्याचे ते म्हणाले.
हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!#realshivsenawins
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
एकनाथ शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, हा विजय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली असली तरी आम्ही शिवसेनेतच आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आम्ही मानतो.
बंडखोर आमदारांना कोर्टाने 12 जुलैपर्यंत दिलासा दिल्यानंतर ठाण्यात शिंदे समर्थकांनी जल्लोष केलाय. ठाण्यातील शिंदेंच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला दिलासा दिल्यानंतर दुसरीकडे महाविकास आघाडीची अडचण वाढली आहे. विधानसभा उपाध्यक्ष, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर याच प्रकरणात केंद्र सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा ठाकरे गटासाठी सर्वात मोठा दिलासा मानला जातो. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्त तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू, असे देखील काल एकनाथ शिंदे म्हणाले.
संबंधित बातम्या :