Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरेंची नियुक्ती झाल्यानंतर भरत गोगावलेंच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
Bharat Gogawale : मागील आठवड्यात रविवारी (दि. 18) राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर करण्यात आली. यात रायगडमधून (Raigad) राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच रायगडमधून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. रायगडममध्ये भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर अवघ्या एक दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय मागे घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली होती. यानंतर 26 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारे झेंडावंदन रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन करतील, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. भरत गोगावले यांचं रायगडचं पालकमंत्रिपद (Raigad Guardian Minister) हुकलं तरी त्यांनी एका शाळेत झेंडावंदन केले आहे. भरत गोगावले यांनी झेंडावंदन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आल्यानंतर शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी (दि. २६) रोजी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या झेंडावंदन करतील, असे नमूद करण्यात आले. त्यामुळे आता रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणार, यावर शिक्कामोर्तब झाले होते.
भरत गोगावलेंनी झेंडावंदन केलंच
आज (दि. 26) भरत गोगावले यांनी खरवली काळीज ग्रामपंचायतमधील आवारात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. भरत गोगावले यांनी त्यांच्या होम ग्राउंडवर झेंडावंदन केले. तसेच, सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद हुकलं तरी देखील भरत गोगावलेंनी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केल्याचे दिसून आले. भारत गोगावले यांनी झेंडावंदन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या