एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे गटाला 'सुप्रीम' दिलासा; बंडखोरांना तूर्तास अभय, कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी

Maharashtra Political Crisis:  एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.

Maharashtra Political Crisis:  एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. या प्रतिवाद्यांना पुढील पाच दिवसात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला 12 जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे. दरम्यान, सर्व आमदारांच्या सुरक्षितेची जबाबदारी ही राज्याचीच असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता विधानसभा उपाध्यक्षांना शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत. विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या अपात्रेतच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आता मुदतवाढ दिल्याने एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

राज्यातील सत्तासंघर्ष थेट सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गट आणि विधानसभा उपाध्यक्ष, शिवसेनेच्या वकिलांमध्ये मोठा युक्तिवाद झाला. या युक्तिवादाच्या दरम्यान काही खटल्यांचा दाखला देण्यात आला आहे.  

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील महत्वाचे मुद्दे 

1) शिंदे गटाच्या वकिलांना सुप्रीम कोर्टानं विचारलं की, हायकोर्टात न जाता सुप्रीम कोर्टात आला? त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं की,  3 कारणं आहेत  226 चे अस्तित्व कलम 32 ला लागू करण्यासाठी घटनात्मक प्रतिबंध नाही. फ्लोअर टेस्ट, अपात्रता यासारख्या कोणत्याही प्रकरणांबाबत सुप्रीम कोर्टातच येण्याबाबतचे निर्देश . अल्पसंख्याक मंत्रिमंडळ राज्ययंत्रणेला उद्ध्वस्त करत आहेत, आमच्या घरांवर हल्ले करत आहेत, आमचे मृतदेह परत येतील असे सांगत आहेत. मुंबईत आमचे हक्क बजावण्यासाठी वातावरण अनुकूल नाही.

2) कोर्टाला हस्तक्षेप करण्यास फार कमी वाव, कोर्ट अंतरिम आदेश देऊ शकतं, वेळेची मर्यादा कोर्ट ठरवू शकतं, प्रकरण अध्यक्षांच्या कक्षेत असताना कोर्टाच्या अधिकारावर निर्बंध, ठाकरेंची अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद 

3)  विधानसभा उपाध्यक्षांनी कागदपत्रांची पूर्तता करावी, अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवादावर सुप्रीम कोर्टाचं मत

4) उपाध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीचं कोर्टात वाचन, पदावरुन हटवण्याचा प्रस्ताव अनधिकृत ई मेलवरुन, ठाकरेंची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवाद

5) उपाध्यक्षांनी 14 दिवसांत प्रस्ताव सभागृहात मांडणं गरजेचं होतं, मात्र त्यापूर्वीच आमदारांना नोटीस, सुप्रीम कोर्टाचं मत तर प्रस्ताव अधिकृत ई मेलवरुन न पाठवल्यानं प्रस्ताव फेटाळला, उपाध्यक्षांचे वकील राजीव धवन यांचा युक्तिवाद 

6) ई मेलबाबत आमदारांना विचारणा करण्यात आली होती का? कोर्टाचा सवाल, ई मेलबाबत प्रतिज्ञापत्र सादर व्हायला हवं होतं, सुप्रीम कोर्टाचं मत

7) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि गटनेते अजय चौधरी यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, पुढील सुनावणी 11 जुलै रोजी

8) 12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना अपात्र करता येणार नाही, नोटीस बजावलेल्या आमदारांना 12 जुलैला संध्याकाळपर्यंत वेळ

9) उपाध्यक्षांचे अधिकार न्यायकक्षेबाहेर आहेत याचे दाखले द्या, सुप्रीम कोर्ट

10 ) 5 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा, सुप्रीम कोर्टाचे सर्व पक्षकारांना आदेश 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Preity Zinta : 'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Supriya Sule Baramati Loksabha : श्रीनिवास पवारांनी फोडला सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळABP MajhaVidarbha 1 Phase Election : विदर्भातील 5 मतदारसंघात 54.85 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोलीतChhagan Bhujbal On Nashik News : नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार, गोडसे हेच उमेदवार?Supreme Court  On OBC : एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची याचिका फेटाळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Preity Zinta : 'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
'बॅकग्राऊंड नसणाऱ्यांनी बॉलीवूडमध्ये येऊ नये', प्रिती झिंटा असं का म्हणाली?
Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
Embed widget