ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024
कर्नाक पुलाचं गर्डर लॉन्चिंग रखडल्याने मध्य रेल्वेने ब्लॉक कालावधी वाढवला, पालिकेकडून समन्वय नसल्याने लोकल आणि एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेचा नकार, प्रवाशांचा खोळंबा
भारताचा आज ७६वा प्रजासत्ताक दिन, कर्तव्यपथावर परेड होणार, 'स्वर्णिम भारत: परंपरा आणि विकास' अशी यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम.
कर्तव्यपथावर आज देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन.. तिन्ही सैन्य दलाच्या शिस्तबद्ध कवायतींची उत्सुकता, ३१ चित्ररथांमध्ये साकारणार स्वर्णिम भारताचा गौरव
सैन्यदलातील ९३ जवानांना शौर्य पुरस्कार, मेजर मनजीत यांना कीर्ति चक्र तर १४ जवानांना शौर्य चक्र, नायक दिलवर खान यांना मरणोत्तर कीर्ति चक्र
प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह शासकीय इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई, तिरंग्याची रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी.
राज्यभरातील शासकीय कार्यालयांसह उजनी धरणालाही तिरंगी रोषणाईची सजावट, पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या तिरंगी रोषणाईने साजरा केला संविधानाचा जागर