Maharashtra News Live Updates : वंदे भारत एक्सप्रेस धावण्याआधी रेल्वेच्या ट्रॅकची तपासणी करताना रेल्वेच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
वंदे भारत एक्सप्रेस धावणाऱ्या रेल्वेच्या ट्रॅकची तपासणी करताना रेल्वेच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू
गोंदिया : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवरून 11 डिसेंबरपासून नागपूर - बिलासपूर दरम्यान 'वंदे भारत एक्सप्रेस' धावणार आहे. या हायस्पीड ट्रेनच्या ऑपरेशन पूर्वी गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातून जाणाऱ्या सालेकसा ते दरेकसा दरम्यान जाणाऱ्या रेल्वे रुळांची पाहणी आज सुरू असताना गोंदिया पोलीस विभागातील बॉम्ब शोध पथकातील पोलीस कर्मचारी विजय नंदकिशोर नशिने (वय 45) यांना याचवेळी रुळावर आलेल्या दरभंगा एक्सप्रेसची जोरदार धडक बसली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. छत्तीसगडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर चिंचवडमध्ये शाई फेकण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला आहे. महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्यावरुन कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलकांची धरपकड सुरु आहे.
गुजरात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार
गुजरात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निमंत्रण.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथविधीला उपस्थित राहणार
NDA चा मित्रपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुपेन पटेल यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण.
मातोश्री एैवजी आता ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शपथविधीसाठी निमंत्रण.
शिवसेना मित्र पक्ष असला तरी ती बाळासाबांची शिवसेना पळा बाबतच गुजरात सरकारकडून विशेष काळजी.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एैवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच गुजरात राज्य सरकारकडून निमंत्रण.
Chandrakant Patil : माझं ब्रेन मॅपिंग करा, चंद्रकांत पाटीलांचं एकनाथ खडसेंना चॅलेंज
Buldana Village for Sale : गावकऱ्यानी गाव काढलं विकायला, अंबाशी गाव विकणे आहे
बुलढाणा जिल्ह्यातील आंबाशी येथील ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच "अंबाशी गाव विकणे आहे" चा फलक लावून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. मागील दीड वर्षापूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे चिखली तालुक्यातील अंबाशी आणि आमखेड येथील दोन्ही धरण फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. तेव्हापासून नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडे धरण आणि शेती दुरुस्तीची मागणी करत आहेत, मात्र शासन अद्यापही याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपलं गावच विकायचं असल्याचा फलक गावाच्या वेशीवर लावलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
