एक्स्प्लोर

Nitin Raut : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान काळात लोडशेडिंग होणार का? उर्जामंत्र्यांनी दिले उत्तर

Nitin Raut : कोळशाच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असून महागडी वीज विकत घेण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

Nitin Raut : राज्यासमोर कोळशाच्या तुटवड्याचं मोठं आव्हान आहे. राज्यात सध्या 17 दिवसांचीच वीजनिर्मिती उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आणखी काय म्हणाले उर्जामंत्री?

कोळश्याच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू

राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत असून केवळ 17 दिवसांची वीजनिर्मिती उपलब्ध आहे. कोळसा टंचाईमुळे राज्यात 3 हजार मेगावॅट विजेची तूट आहे. राज्यात वीजेची मागणी 30 हजार मेगावॅट पर्यंत वाढण्याचा अंदाज उर्जामंत्र्यांनी वर्तविला आहे. कोळश्याच्या तुटवड्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असून महागडी वीज विकत घेण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. दीर्घ मुदतीच्या कर्जाची फेररचना करून वीजेसाठी पैसा उभारण्याचे प्रयत्न करणार असल्याचे उर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान राज्यात लोडशेडिंग होऊ नये यासाठी काळजी घेत असल्याचंही नितीन राऊत यावेळी म्हणाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान काळात लोडशेडिंगबाबत उर्जामंत्री म्हणाले...
पत्रकारांशी संवाद साधताना नितीन राऊत म्हणाले, वीज चोऱ्या अधिक असलेल्या भागात भारनियमन करण्यात येणार आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी वॉररूमही तयार करण्यात येणार आहे, दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान या काळात भारनियमन टाळण्याचे प्रयत्न करणार आहे. या काळात ग्राहकांकडून सहकार्याची अपेक्षा असून दररोज सकाळी 6 ते सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत वीज वाचवण्याचे आवाहन करतो." असे उर्जामंत्री म्हणाले

महावितरणकडून आजपासून राज्यातील काही भागात लोडशेडिंग जाहीर 

देशांतर्गत कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेच्या पुरवठ्याच्या तुलनेत विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्याने हे लोडशेडिंग केले जात आहे. "वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्हाला 2,500 ते 3,000 मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे- त्यामुळेच आम्ही लोडशेडिंग करत आहोत. आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही, तसेच ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे," असे महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले.  महाराष्ट्रातील 2.8 कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने मंगळवारपासून राज्यातील काही भागात लोडशेडिंग जाहीर केले आहे. मात्र या उन्हाळ्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला याचा फटका बसणार नाही. असे देखील महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भांडुप-मुलुंड, ठाणे आणि नवी मुंबई येथे महावितरणचे भारनियमन करणार नाही, कारण या भागात वीजबिल वसुली देखील उत्तम आहे असे महावितरणच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ज्या ठिकाणी वीजचोरी, वीज वितरण हानी आणि बिलाची वसुली कमी आहे अशा ठिकाणी आम्ही लोडशेडिंग करू. यामध्ये G1, G2 आणि G3 श्रेणीतील ग्राहकांचा समावेश आहे, जे बहुतांशी मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण भागात आहेत.

विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील काही भागांना लोडशेडिंगचा फटका बसणार

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. "काही शहरी भागात, आम्ही वीज खंडित करत असलो तरीही, आम्ही ते दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची योजना आखत आहोत," असे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुकेश अंबानी मला विचारतात, कैसे हो पंकजा?; मुंडेंचं भाषण, परळीकरांना आश्वासन
मुकेश अंबानी मला विचारतात, कैसे हो पंकजा?; मुंडेंचं भाषण, परळीकरांना आश्वासन
OTT Release This Week :  आर्टिकल 370 , सायलेन्स 2; ओटीटीवर 'या' आठवड्यात काय पाहाल?
आर्टिकल 370 , सायलेन्स 2; ओटीटीवर 'या' आठवड्यात काय पाहाल?
Eknath Shinde : 'अबकी बार सुनेत्राताई पवार, आता भाकरी फिरवायची वेळ आलीय': एकनाथ शिंदे
'अबकी बार सुनेत्राताई पवार, आता भाकरी फिरवायची वेळ आलीय': एकनाथ शिंदे
Ajit pawar : खोट्या प्रचाराला, भावनिकतेला बळी पडून नका, बारामतीला लीड मिळणार की नाही बारामतीकर सांगतील; अजित पवारांचा टोला
'खोट्या प्रचाराला, भावनिकतेला बळी पडून नका, बारामतीला लीड मिळणार की नाही बारामतीकर सांगतील'
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Damayanti Raje Bhosale : उदयनराजेंनी कधीच स्वार्थ पाहिला नाही - दमयंतीराजे भोसलेMahayuti Thane Nashik : नाशिकसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही तर ठाण्यासाठी भाजप हट्टीEd Action Shilpa Shetty : राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती जप्त, शिल्पाच्या बंगल्याचाही समावेशSushma Andhare Full Speech :बारामतीची लढाई बाई विरुद्ध बाई अशी पाहू नका - सुषमा अंधारे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुकेश अंबानी मला विचारतात, कैसे हो पंकजा?; मुंडेंचं भाषण, परळीकरांना आश्वासन
मुकेश अंबानी मला विचारतात, कैसे हो पंकजा?; मुंडेंचं भाषण, परळीकरांना आश्वासन
OTT Release This Week :  आर्टिकल 370 , सायलेन्स 2; ओटीटीवर 'या' आठवड्यात काय पाहाल?
आर्टिकल 370 , सायलेन्स 2; ओटीटीवर 'या' आठवड्यात काय पाहाल?
Eknath Shinde : 'अबकी बार सुनेत्राताई पवार, आता भाकरी फिरवायची वेळ आलीय': एकनाथ शिंदे
'अबकी बार सुनेत्राताई पवार, आता भाकरी फिरवायची वेळ आलीय': एकनाथ शिंदे
Ajit pawar : खोट्या प्रचाराला, भावनिकतेला बळी पडून नका, बारामतीला लीड मिळणार की नाही बारामतीकर सांगतील; अजित पवारांचा टोला
'खोट्या प्रचाराला, भावनिकतेला बळी पडून नका, बारामतीला लीड मिळणार की नाही बारामतीकर सांगतील'
Makarand Anaspure : एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यास काय करणार? मकरंद अनासपुरेच्या उत्तराने कराल कौतुक
एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यास काय करणार? मकरंद अनासपुरेच्या उत्तराने कराल कौतुक
Supreme Court on EVM :
"ईव्हीएम बटण दाबताच भाजपला मतदान" सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला चौकशीचे आदेश!
EVM घोळाबाबत याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
EVM घोळाबाबत याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
Devendra Fadanvis : बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील; देवेंद्र फडणवीस
Devendra Fadanvis : बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील; देवेंद्र फडणवीस
Embed widget