Ram Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषण
निवडणुकीविरोधात काम केले आणि आता भाजप नेत्याचे पाय धरत आहेत. ही डबल ढोलकी चालणार नाही. रणजितसिंह मोहिते पाटील थोडी जरी लाज शिल्लक असेल तरी राजीनामा द्या. कारण तुम्ही भाजपविरोधात काम केलंत. गद्दारांना माफी नको हे फडणवीस साहेबांना सांगा. व्हाट्सअपवर गोष्टी टाकणं बंद करा. राम सातपुते चांगल्या चांगल्यांना घोडा लावून इथपर्यंत पोहोचलाय. आमच्या कार्यकर्त्याला मारलं, जर आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर मी धमकी देणार नाही भर चौकात नागडं करून मारू, अशी धमकीच भाजपच्या राम सातपुतेंनी मारकडवाडीतील सभेत दिली. मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू असं म्हणत भाजपनेते राम सातपुते यांनी मारकडवाडीतील आतापर्यंतचे सर्वात आक्रमक भाषण केले आहे.
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मरकडवाडी येथे हजेरी लावल्यानंतर आता मरकडवाडीत आज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडणार आहेत. दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे पवारांच्या सभेला उत्तर देत असून भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन दाखवले आहे.