एक्स्प्लोर

Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर

Santosh Deshmukh : केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

बीड : केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) असे सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आला. यानंतर मृताचे नातेवाईक संतप्त झाले असून अहमदनगर -अहमदपूर महामार्गावर (Ahmadnagar Ahmedpur Highway) रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. 
  
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता.  मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. 

मृताचे नातेवाईक आक्रमक

संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते. त्यांनी मस्साजोग ग्रामपंचायतला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणी अहमदनगर-अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको केला जात आहे. मृताचे नातेवाईक संतप्त झाले असून रास्ता रोको करत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली जातेय. रास्ता रोकोच्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक दाखल झाले असून नातेवाईकांची समजूत काढली जात आहे.

पुण्यात देखील अपहरण अन् हत्या

दरम्यान, पुणे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण झाले होते. आता सतीश वाघ यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. यवत गावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकला गेले होते. घरापासून काही अंतरावर जाताच चार जणांनी त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनात डांबले आणि काही समजण्याच्या आतच त्यांचं अपहरण केलं होतं. मांजरा परिसरात ही घटना घडली घडली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kurla Bus Accident: कुर्ल्यात बेस्ट बस लोकांना चिरडत गेली; 7 निष्पापांचा बळी, बेस्टचालक संजय मोरेचा फोटो व्हायरल

Crime News: साधा बाईकचा धक्का लागला अन् नुकतंच मिसरुड फुटलेल्या पोरांनी धारदार चाकू नाचवत धिंगाणा घातला, छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा वचक संपला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Embed widget