एक्स्प्लोर
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 80 कार्यकर्त्यांवर जमाव बंदी आदेश मोडल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute Belgaum News
1/10

मराठी भाषकांच्या महामेळाव्याला कन्नड पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जमावबंदीचा आदेश लागू केला होता.
2/10

पण त्याला दाद न देता शेकडो मराठी भाषिकांनी जोरदार घोषणाबाजी करत धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन केलं. मराठी भाषकांनी महाराष्ट्रात जाण्याची आपली इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली.
3/10

यावेळी पोलिसांनी दडपशाही करून महामेळावा होणार असलेल्या ठिकाणी गनिमी काव्याने दाखल होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळीना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
4/10

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 80 कार्यकर्त्यांवर जमाव बंदी आदेश मोडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5/10

महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात सोमवार पासून सुरू होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौक येथे सकाळी 11 वाजता महामेळावा आयोजित केला होता.
6/10

सकाळी 10.30 वाजताच माजी आमदार मनोहर किणेकर आणि कार्यकर्ते धर्मवीर संभाजी चौक परिसरात वेळेआधीच दाखल झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून समिती कार्यकर्त्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
7/10

यावेळी पोलिसांनी तेथे धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळाने दुसऱ्या बाजूने आणखी एक कार्यकर्त्यांची तुकडी घोषणा देत दाखल झाली. पुन्हा कार्यकर्त्यांच्या तुकड्या धर्मवीर संभाजी चौकात दाखल झाल्या.
8/10

यावेळी वेगवेगळ्या दिशेने आणि थोड्या थोड्या वेळाने दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना मारीहाळ पोलीस स्थानकात हलवले.
9/10

सायंकाळी सगळ्या कार्यकर्त्यांना मारी हाळ पोलीस स्थानकातून सोडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशी जोरदार घोषणाबाजी केली.
10/10

पोलिसांनी दडपशाही करून महामेळावा होऊ दिला नाही तरी पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जमाव बंदी आदेशाला न जुमानता आणि अटकेला न घाबरता महामेळावा होणार असलेल्या ठिकाणी दाखल होऊन मराठी अस्मितेचे दर्शन घडवत पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली.
Published at : 09 Dec 2024 07:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























