एक्स्प्लोर

Maharashtra Government Jobs : 75 हजार पद भरतीतला मोठा अडथळा दूर, कोणत्या खात्यात किती जागा?

Maharashtra Government Jobs : 75 हजार पद भरतीमधील मोठा अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी करत नियम शिथील केले आहेत.

Maharashtra Government Jobs : 75 हजार पद भरतीमधील मोठा अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी करत नियम शिथील केले आहेत.  कोरोना महामारीमुळे नोकर भरतीला घातलेली 50 % ची मर्यादा शिथिल करत आता शंभर टक्के नोकरभरती करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकरने घेतलाय. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षात राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे.  सरकारने घेतलेल्या या निर्णायामुळे शासनाच्या  29 विभागातील 75 हजार पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सरकारनं ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्याची मुभा दिली आहे. 

ज्या विभागाचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागांमधील गट-अ व गट-ब गट ब मधील वाहनचालक व गट-ब संवर्गातील पदे वळून सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा दिली आहे. सरकारने मंजूर आकृतिबंध बाजूला ठेवून नोकर भरती करण्याची भूमिका घेतली आहे ही शिथिलता पुढची वर्षभर लागू असेल. 

कोरोना महामारीमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने नोकरभरती वरती राज्य सरकारने बंधनं आणली होती. 50 टक्के मर्यादा ठेउन नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोविडसंपताच शिंदे सरकरने ही मर्यादा उठवली आहे. त्यामुळे आता शंभर टक्के नोकर भरती होणार आहे.  राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405  जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.  

शासन निर्णायामध्ये नेमकं काय आहे?

ज्या विभागांचा/कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात यत आहे. 

ज्या विभाग/कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग/कार्यालयांतील गट अ, गट ब व गट क मधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरम्यास मुभा देण्यात येत आहे. 

वरील(अ) आणि (ब) प्रमाणे शिथीलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभाग शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 अन्वये करण्यात येईल. 

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये  नोकर भरती होऊ शकली नाही. त्यामुळे देशाच्या  अमृत महोत्सवीवर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काहीदिवसात ही वेगवेगळ्याविभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील. मात्र नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्तनिर्णय होताना पाहायला मिळाले. पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कसं करणार याकडेसगळ्यांचे लक्ष लागलंय. कोणत्या विभागात अंदाजीत किती नोकर भरती होणार ...

आरोग्य खाते – 10 हजार 568

गृह खाते – 14 हजार 956 

ग्रामविकास खाते – 11,000

कृषी खाते – 2500

सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337

नगरविकास खाते – 1500

जलसंपदा खाते – 8227

जलसंधारण खाते – 2,423

पशुसंवर्धन खाते – 1,047

किती जागा रिक्त?

गृहविभाग- 49 हजार 851

सार्वजनिक आरोग्य विभाग : 23 हजार 822

जलसंपदा विभाग : 21 हजार 489 

महसूल आणि वन विभाग : 13 हजार 557

वैद्यकीय शिक्षण विभाग : 13 हजार 432

सार्वजनिक बांधकाम विभाग : 8 हजार 12

आदिवासी विभाग : 6 हजार 907

सामाजिक न्याय विभाग : 3 हजार 821

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget