समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध
हजारो शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) विरोध केला आहे. तरी सरकारचा अट्टाहास का? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
Vijay Wadettiwar : हजारो शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Highway) विरोध केला आहे. तरी सरकारचा अट्टाहास का? असा सवाल करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. समृद्धी महामार्ग बांधला किती उत्पन्न आहे. आमचे सगळ्यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांचा विरोध असताना हा महामार्ग करु नका, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने लढू असे वडेट्टीवार म्हणाले. ज्या मार्गाची गरज नाही त्याचा अट्टहास का करायचा? असा सवालही त्यांनी केला. सम्रुद्धी मार्गाने गेलं की बायको घरी वाट बघते, नवरा घरी येइल की नाही? एवढा बोगस रस्ता बनवला आहे असे वडेट्टीवार म्हणाले.
हे डबल ढोलकी सरकार
हे डबल ढोलकी सरकार आहे. एकनाथ शिंदे म्हणाले शक्तिपीठ महामार्ग होणार नाही. निवडणूक झाल्यावर भूमिका बदलली. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संयुक्त जबाबदारी आहे. आज बहुमत आहे म्हणून सुरु आहे उद्या जनता जागा दाखवेल असेही वडेट्टीवार म्हणाले. शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार सांगितले आणि मतं मागितली. आता मात्र कर्जमाफी करत नाहीत. शेतकऱ्यांनी ज्या मातीत घाम गाळला आहे, त्याच मातीत शेतकरी त्यांना गाडतील अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
तिघांची तोडं तीन दिशेला आहेत. खाताना मात्र एक येतात असे वडेट्टीवार म्हणाले. एक म्हणतो होणार नाही दुसरा म्हणतो झाल्याशिवाय राहणार नाही. हे डबल ढोलकी आहे. सम्रुद्धी मार्गाने गेल की बायको घरी वाट बघते नवरा घरी येइल की नाही, एवढा बोगस रस्ता बनवला आहे असे वडेट्टीवार म्हणाले. टक्केवारीचं हे सरकार आहे. शेती आणि माती आमची आई आहे. आम्ही तुम्हाला गाढल्याशिवाय राहणार नाही असे वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्री कोल्हापूरात गेले आणि म्हणाले की, महामार्ग करणारतर एकनाथ शिंदे नाही म्हणतात. त्यांचं कोणी ऐकत नाही हा खरा प्रश्न आहे असं वडेट्टीवार म्हणाले. शेतकऱ्यांचं भल होईल अस वाटत नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.
सरकारच्या धोरणामुळं एका वर्षात 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या
सरकारच्या धोरणामुळे एका वर्षात 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले. विरोधक म्हणून तुमच्या आम्ही पाठिशी आहोत. आमचा निर्धार पक्का आहे. ज्या मार्गाची गरज नाही याचा अट्टहास का करायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या लढ्यात 100 टक्के तुमच्या सोबत आहोत. तुम्ही सोबत राहा ही गॅरंटी द्या असेही ते म्हणाले. ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























