Maharashtra Politics LIVE Updates : महाराष्ट्रात 'शिंदे'शाही! राज्यातील राजकीय नाट्याला वेगळं वळण, सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Politics LIVE Updates : महाराष्ट्रात शिंदे सरकार... भाजपच्या धक्कातंत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेशाहीची सुरुवात, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
LIVE

Background
कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्र्याना शुभेच्छा एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा उद्धव ठाकरे यांचे देखील फोटो .....
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कल्याण डोंबिवली शहरात जागोजागी त्यांना शुभेच्छा देणारे बनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवसैनिकांनीच हे बनर लावले असून त्यावर उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो शिंदे यांच्या समवेत झळकला आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना दुसरीकडे शिवसैनिक काहीशी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर आणि बॅनरवर देण्यात आलेल्या शुभेच्छामुळे चर्चेला उधाण आल्यानंतर आता आपण शिवसैनिक असून ठाणे जिल्ह्याला शिंदे यांच्या रूपाने प्रथमच मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला असून मुख्यमंत्री आपण आजही शिवसेनेचे नेते असल्याचे सांगत आहेत. डोंबिवलीतील रमेश म्हात्रे, कल्याणातील नवीन गवळी, मोहन उगले यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि माजी नगरसेवकांनी शुभेच्छा देणारे बनर लावले आहेत. याबाबत नगरसेवकांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मंत्री ,एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे आमचे दैवत आहेत शिवसैनिक म्हणून आम्ही हे बॅनर लावलेत यांनी एकत्र यावं हीच आमची इच्छा आहे असं सांगितलं मात्र याबाबत कॅमेरावर बोलण्यास नकार दिला.
कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा, बॅनरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कल्याण डोंबिवली शहरात जागोजागी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवसैनिकांनीच हे बॅनर लावले असून त्यावर उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो शिंदे यांच्यासोबत झळकला आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना दुसरीकडे शिवसैनिक काहीशी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर आणि बॅनरवर देण्यात आलेल्या शुभेच्छांमुळे चर्चेला उधाण आले आहे. आपण शिवसैनिक असून ठाणे जिल्ह्याला शिंदे यांच्या रूपाने प्रथमच मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला असून मुख्यमंत्री आजही शिवसेनेचे नेते असल्याचे सांगत आहेत. डोंबिवलीतील रमेश म्हात्रे, कल्याणमधील नवीन गवळी, मोहन उगले यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि माजी नगरसेवकांनी शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत.
"शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे आमचे दैवत आहेत. शिवसैनिक म्हणून आम्ही हे बॅनर लावले आहेत, यांनी एकत्र यावं हीच आमची इच्छा आहे असे नगरसेवकांनी यावेळी सांगितले.
Eknath Shinde : रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय सुरु करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या प्रस्तावित निर्णय़ाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकृत ट्वीटरवरुन त्यांनी ही माहिती दिली.
कोकणातील #रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला दिलेले आहेत. #Ratnagiri #GovernmentMedicalCollege
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तर उर्वरित बंडखोर आमदार उद्या गोव्यावरुन मुंबईत परतणार
CM Eknath Shinde To Retrun Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गोव्यावरुन मुंबईला परतणार आहेत. तर इतर बंडखोर आमदार उद्या मुंबईतील परत येतील, अशी माहिती आहे. मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यासाठी तातडीने मुंबईला रवाना होतील, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Uddhav Thackarey LIVE : माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका : उद्धव ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

