एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेकायदेशीर बंगला कोणाचाही असो, कारवाई झालीच पाहिजे : हायकोर्ट
एका खटल्याच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने स्पष्ट केले की, एखादी मालमत्ता कोणाच्याही ताब्यात असेल, परंतु ती मालमत्ता जर बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई ही झालीच पाहीजे.
मुंबई : अलिबाग समुद्र किनाऱ्यालगत अनेक बेकायदेशीर बंगले आहेत. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा बंगलादेखील याच परिसरात आहे. येथील बेकायदेशीर बंगल्याबाबत ईडीने आपली भूमिका सोमवारी हायकोर्टासमोर स्पष्ट केली. ईडीचे म्हणणे आहे की, ही मालमत्ता सध्या ईडीच्या ताब्यात आहे. त्यामुळे याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पीएमएलए कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यावर हायकोर्टाने स्पष्ट केले की, एखादी मालमत्ता कोणाच्याही ताब्यात असेल, परंतु ती मालमत्ता जर बेकायदेशीर असेल तर त्यावर कारवाई ही झालीच पाहीजे. हायकोर्टाने तूर्तास ही सुनावणी 28 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.
अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अजुनही निधी उपलब्ध झालेला नाही. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर एका दिवसात स्थानिक प्रशासनाने आणखीन पाच बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाई पूर्ण केली.
नीरव मोदीचा बंगला ज्या परिसरात आहे. तिथल्या 58 पैकी 10 बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाई पूर्ण केल्याचे प्रतिज्ञापत्र सोमवारी हायकोर्टात सादर करण्यात आले. यातील 42 बंगल्यांबाबत सत्र न्यायालयाने परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उर्वरीत 6 बंगल्यांवर लवकरच हातोडा चालवला जाईल, अशी ग्वाही सरकारी वकील पी.पी. काकडे यांनी कोर्टाला दिली.
या परिसराती अनेक बंगले हे स्थानिकांचेच असल्यामुळे ते तोडण्यासाठी स्थानिक लोक साधने आणि मनुष्यबळ पुरवत नाहीत. त्यामुळे या कारवाईसाठी लागणारे जेसीबी आणि इतर साधनांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी हायकोर्टाला केली होती.
बॉलिवूडमधील सिनेस्टार तसेच मुंबईतील बड्या व्यापाऱ्यांनी अलिबागमध्ये समुद्रालगत जमिनी विकत घेऊन तिथे बेकायदा बंगले उभारले आहेत. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन वर्सोली, सासवणे, कोलगाव, डोकवडे, रेवदांडा या गावांमध्ये हे बंगले उभारण्यात आले आहेत. याप्रकरणी सुरेंद्र धावले यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.
पाहा व्हिडीओ : अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर बंगल्यांवरील कारवाई बंद | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement