एक्स्प्लोर

दुष्काळाशी लढण्याची तयारी, चारा छावण्या सुरू करणार

2 हजार 900 कोटी रुपयांचा निधी विभागीय आयुक्तस्तरावर वितरित करण्यात आला आहे. लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

मुंबई : राज्य शासनाने दुष्काळ निवारणासाठी दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या निधीतून सुमारे 2 हजार 900 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णयही घेतला असल्याची माहिती, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंडळस्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात येणार पाटील म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी गठित समितीच्या आजच्या बैठकीत विविध उपायांवर चर्चा झाली. यावेळी चारा छावण्या सुरू करण्यासाठीच्या नियमावलींवर चर्चा झाली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव आल्यानंतर मंडळस्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात येणार आहेत. एका छावणीमध्ये साधारणपणे 300 ते 500 जनावरांचा समावेश असणार आहे. जनावरांच्या संख्येसंदर्भात तसेच आवश्यकता भासल्यास एकाच मंडळात दुसरी छावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार आहे. राज्य शासनाने अनुदान दिलेल्या गोरक्षण संस्थांना चारा छावणी उघडण्याचे यापूर्वीच निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पाच ठिकाणी पूर्वीच चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. 2 हजार 900 कोटी रुपयांचा निधी वितरित केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान मिळावी, यासाठी केंद्र शासनाकडे सुमारे 7 हजार 900 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. केंद्राची मदत जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या निधीतून मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार 2 हजार 900 कोटी रुपयांचा निधी विभागीय आयुक्तस्तरावर वितरित करण्यात आला आहे. लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.  वीज बिला अभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू होणार पाटील म्हणाले, पाणीटंचाई दूर करण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजनेचे पाईपलाईन दुरुस्तीचे तसेचे तात्पुरत्या नवीन पाईपलाईनच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत  अनेक योजनांना यामधून मंजुरी दिली आहे. तसेच थकित वीजबिलामुळे बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी थकित बिलातील पाच टक्के रक्कम टंचाई निधीतून राज्य शासनाने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज बिला अभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहेत. गाळपेर जमिनींवर चारा उत्पादन चारा टंचाई कमी करण्यासाठी गाळपेर जमिनींवर चारा उत्पादन करण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैरण विकास योजनेतून दहा हजार क्विंटल बियाणे पुरविण्यात आले असून 35 हजार हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. तसेच हिरव्या वैरणीपासून मूरघास बनविण्याच्या यंत्रासाठी 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णयही घेतला आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking News Updates: उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर
Maharashtra Live Breaking News Updates: उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर
Union Cabinet Reshuffle 2026: महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला केंद्रात अर्थखातं मिळणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला केंद्रात अर्थखातं मिळणार? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
Rain Alert: पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, IMD चा अंदाज काय?
पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, वादळी पावसात पोलीस स्टेशनचे छप्परही उडालं, आज कसं असेल हवामान?
Raj Thackeray In Sanjay Dina Patil Constituency: उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

व्हिडीओ

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert: पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, IMD चा अंदाज काय?
पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, वादळी पावसात पोलीस स्टेशनचे छप्परही उडालं, आज कसं असेल हवामान?
Raj Thackeray In Sanjay Dina Patil Constituency: उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार; आजच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Share Market : किर्लोस्कर ते सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
Embed widget