Dhananjay Deshmukh: 'विष्णू चाटेच्या माेबाईवरून अनेक वरिष्ठांना फाेन, धनंजय देशमुखांचा गौप्यस्फोट, म्हणाले, 'या प्रकरणातून कसं वाचायचं याबाबत..'
संतोष देशमुख यांच्या खूनाला 56 दिवस उलटले आहेत. तरीही कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.

Dhananjay Deshmukh: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याचा कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. या प्रकरणात आता भगवानगडानंतर नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांची एन्ट्री झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन तब्बल 56 दिवस उलटले आहेत. एक आरोपी अजूनही फरार आहे. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी फरार आरोपी विष्णू चाटेच्या फोनवरून अनेक वरिष्ठांना फोन गेलेत. या प्रकरणातून कसं वाचायचं या संदर्भात बोलणं झालं असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. केवळ पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला गेल्याने आम्ही समाधानी नसल्याचेही ते म्हणालेत.(Santosh Deshmukh case)
दरम्यान एकीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे धनंजय देशमुख यांनी फरार आरोपी विष्णू चाटेच्या फोनबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. विष्णू चाटे चा मोबाईल मिळायला हवा त्यातून अनेक वरिष्ठांना फोन गेलेत. या प्रकरणातून कसं वाचायचं हे फोनवर बोललं गेलंय. असंही धनंजय देशमुख म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
संतोष देशमुख यांच्या खूनाला 56 दिवस उलटले आहेत. तरीही कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत धनंजय देशमुख यांनी कृष्णा आंधळेला पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर आमच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली नसती असा आरोप केलाय. ते म्हणाले, ' कृष्णा आंधळे फरार असताना तू पोलिसांसोबत फिरत होता. विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला पाहिजे. त्यात अनेक व्हिडिओ आहेत. काही महत्त्वाचे पुरावे आहेत. या आरोपीवर केवळ पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद करून काहीच उपयोग नाही . असंही 100% या आरोपींना फाशी होणार आहे, पण त्या मोबाईलमध्ये जे काही पुरावे आहेत, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप ,काही फोन कॉल आहेत याची सगळी जबाबदारी ही प्रशासनाला घ्यायची आहे. यासंदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना मी काल केली आहे . आरोपींना फाशी होणार आहे पण विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये जे गंभीर गुन्ह्यांचा डाटा आहे . तो आपल्याला पाहिजे . आरोपीचे त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असणारे व्हिडिओ कॉल, फोन कॉल, ऑडिओ क्लिप आहे.यातून अनेक वरिष्ठांना कॉल करण्यात आलेले आहेत. ज्यांनी हा खून केलेला आहे, हे संघटित गुन्हेगारीचा मोठ जाळं आहे . त्यांचा मोबाईल समोर आणल्याशिवाय अनेक गोष्टी समोर यायच्या आहेत त्या माहीत होणार नाहीत .असं धनंजय देशमुख म्हणाले .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

