एक्स्प्लोर
Devendra Fadnavis On Nagpur Voilance: नागपुरात सफेद रंगाची दगड भरलेली ट्रॉली; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सर्व सांगितलं, PHOTO
Devendra Fadnavis On Nagpur Voilance: नागपूरमधील घटनेनंतर पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे.

Devendra Fadnavis On Nagpur Voilance
1/8

नागपूरच्या काल (17 मार्च) झालेल्या हिंसाचाराच्या (Nagpur Voilance) पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केलं.
2/8

नागपुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी औरंगजेबाची कबर हटाव आंदोलन केलं. त्यांनी प्रतिकात्मक कबर जाळली. या संदर्भात गुन्हा ही दाखल झाला. मात्र त्यानंतर धार्मिक मजकुर असलेलं जाळण्यात आलं असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यांनंतर तोंडावर रुमाल बांधून आंदोलन केलं. यात 3 डिसीपी लेव्हलचे अधिकारी जखमी झालेले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.
3/8

एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने घाव केला आहे. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे, त्यांना सोडलं जाणार नाही, असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला.
4/8

पोलिसांना एक दगड भरलेली ट्रॉली मिळाली. या ट्रॉलीमध्ये मोठ्या प्रमाणात दगड भरलेले होते, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
5/8

देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात उल्लेख केलेल्या ट्रॉलीचे फोटो एबीपी माझ्याच्या हाती लागले आहेत.
6/8

सफेद रंगाची ही ट्रॉली दिसत आहे. यामध्ये दगड असल्याचे देखील दिसत आहे.
7/8

सदर ट्रॉली ज्या भागात होती, त्याच भागात मोठ्या प्रमाणात काल दगडफेक झाली होती.
8/8

सदर घटनेनंतर पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे.
Published at : 18 Mar 2025 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
विश्व
शेत-शिवार
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion