एक्स्प्लोर

बीडचा रॅन्चो | आठवीत शिकणाऱ्या शेतकरीपुत्राने बनवला सौर उर्जेवर चालणारा ट्रक

ना डिझेल ना पेट्रोल ना इंधन ना करंट. केवळ सूर्यप्रकाशावर चालणारा ट्रक महेशने तयार केला आहे. रस्त्यावरून चालणारा हा ट्रक केवळ सोलरवर चालतो. विशेष म्हणजे अधिक रुपये खर्च न करता ही किमया महेशने करून दाखवली आहे.

बीड : कल्पकता आणि काहीतरी नवीन करण्याची धडपड ही केवळ शहरी भागांमध्ये शिकणार्‍या मुलातच असते असं नाही तर ग्रामीण भागांमध्ये अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलंसुद्धा यात नक्कीच कमी नाहीत हे वारंवार सिद्ध होते. बीडच्या सुर्डी जिल्हा परिषद शाळेमध्ये आठवीत शिकणाऱ्या महेश धांडे या विद्यार्थ्याने चक्क सोलर वर चालणारा ट्रक बनवला. त्यामुळे महेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेवराई तालुक्यातील सुर्डी जिल्हा परिषद शाळेतील आठवीत शिकणाऱ्या महेश धांडेने अडगळीला पडलेल्या वस्तू एकत्रित करून हा मिनी ट्रक बनवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत असणाऱ्या महेशला मोठं होऊन इंजिनीअर व्हायचं आहे. यापूर्वीही त्याने अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत. मात्र या सोलर एनर्जीच्या प्रयोगामुळे तो सध्या त्याचं कौतुक होत आहे. सध्या वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळे प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून महेशने शाळेत वापरात नसलेल्या एका सोलार प्लेटवर चालणारा ट्रक बनवला आहे.
महेशचे आई-वडील शेतकरी आहेत. महेश घरी असतानाही सतत काही ना काही तरी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आईवडिलांना देखील त्याच कौतुक वाटत आहे. नेहमीच नवनवीन प्रयोग करताना तो घरातल्या जुन्या वस्तूचा वापर करतो वापरात नसलेले इलेक्ट्रिकच्या वस्तूंपासून तो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो.
सध्या महेशच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षकांना ही अभिमान वाटत आहे. त्याने जेव्हा हा ट्रक शाळेत सरांना दाखवण्यासाठी आणला तेव्हा त्यांनाही हे पाहून आश्चर्य वाटलं. महेशने बनवलेला हा ट्रक आणि या सोलरपासून मिळणारी ऊर्जा त्यात निश्चित मर्यादा आहेत. ट्रॅक्टरची क्षमता आणि यासाठी वापरलेले उपकरणे यालाही मर्यादा आहेत पण महेशने आपल्या कल्पक बुद्धीने कोणत्याही इंधनाशिवाय साकारलेली ही ट्रक हा मोठा प्रयोग आहे. महेश सारखा प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज अधिक बळ मिळालं तर याच विद्यार्थ्यांमध्ये आमचे उद्याचे संशोधक घडत आहेत असं म्हटलं तर ते निश्चितच वावगं ठरणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी

मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले

ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार

गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप

शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 

नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?

Embed widget