एक्स्प्लोर
लष्करी वैद्यकीय सेवेतर्फे देशात दहा विषाणू संशोधन संस्था उभारणार
कोरोना व्हायरसमुळे चीनसारखा शक्तिशाली देश मेटाकुटीला आला आहे . त्यामुळं भारतात अशी आणीबाणीची परिस्थिती उद्धभवल्यास त्याला सामोरं जाता यावं यासाठी विषाणू संशोधन करणाऱ्या दहा नवीन संस्था उभारण्याचं लष्करी वैद्यकीय सेवेने ठरवलं आहे .
पुणे : विषाणूजन्य आजारांचा वाढता धोका , त्याचबरोबर जैविक आणि रासायनिक हल्ल्यांची भिती लक्षात घेऊन देशात दहा विषाणू संशोधन संस्थांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लष्करी वैद्यकीय सेवेतर्फे देशातील विविध शहरांमध्ये या संस्था उभारण्यात येणार आहेत. लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांनी पुण्यात एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे. देशात सध्या विषाणूंवर संशोधन करणाऱ्या दोनच संस्था आहेत. त्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही पुण्यात आहे तर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ही संस्था दिल्लीला आहे. या दोन संस्थांवर पडणारा ताण लक्षात घेता देशात आणखी संशोधन संस्था सुरू करण्याची गरज अनेकदा अधोरेखित झाली आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनसारखा शक्तिशाली देश मेटाकुटीला आला आहे . त्यामुळं भारतात अशी आणीबाणीची परिस्थिती उद्धभवल्यास त्याला सामोरं जाता यावं यासाठी विषाणू संशोधन करणाऱ्या दहा नवीन संस्था उभारण्याचं लष्करी वैद्यकीय सेवेने ठरवलं आहे . शिवाय जैविक आणि रासायनिक हल्ल्यांचा धोकाही गांभीर्यानं घेण्याची गरज आहे .अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक ठिकाणी रासायनिक हल्ले झाल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत . तशाच प्रकारच्या दहा संस्था देशातील वेगवगेळ्या शहरांमध्ये उभारल्या जाणार आहेत.
Virus Eradication | देशात 10 विषाणू संशोधन संस्था उभारणार | ABP Majha
या दहा संस्था राष्ट्रीय , राज्यस्तरीय आणि स्थानिक अशा तीन स्तरांवर उभारल्या जातील . सध्या देशात विषाणू संशोधनावर काम करणाऱ्या फक्त दोन संस्था आहेत .1952 ला पुण्यात स्थापन झालेली राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या अवघ्या दोन संस्थांवर विसंबून राहणं भारतासारख्या देशाला परवडणारं नाही . देशात कुठेही साथीचे आजार उद्भवले तर रुग्णांचे नमुने टेस्टिंगसाठी पुण्यातील या संस्थेमध्येच येतात. या आधी स्वाईन फ्लू , इबोला , सार्स , चिकनगुनिया अशा विषाणूंच्या साथीमध्ये देशात फक्त या दोन संस्थांवरतीच भारताला अवलंबून राहावं लागलं होतं.
खरं तर देशात विषाणू संशोधन संस्थांची गरज या आधी अनेकदा बोलून दाखवण्यात आली आहे . परंतु त्या उभ्या करण्यासाठी गरजेचा असलेला निधी आणि इच्छा शक्ती दिसून आलेली नाही . मात्र कोरोना व्हायरसमुळे जगभरात निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे अशा संशोधन संशोधन संस्थांच्या निर्मितीमध्ये चालढकल करणं किती महागात पडू शकतं हे स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर इथून पुढच्या युद्धांमध्ये किंवा लष्करी संघर्षांमध्ये जैविक आणि रासायनिक हल्ल्यांची शक्यताही नाकारता येण्यासारखी नाही .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
व्यापार-उद्योग
सोलापूर
पुणे
Advertisement