MS Dhoni Fast Stumping : शेर अभी बुढा नही हुआ, 0.12 सेकंदात धोनीची कमाल, सूर्यकुमार यादवला दाखवला बाहेरचा रस्ता
आयपीएल 2025 चा तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे.

MS Dhoni Stumping to Dismiss Suryakumar Yadav : आयपीएल 2025 चा तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. 23 मार्च रोजी चेपॉक येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून मैदानात उतरला. जरी एमएस धोनी 43 वर्षांचा असला तरी त्याच्या स्टंपिंगमुळे आजही सर्वांना आश्चर्यचकित केले.
𝙁𝙖𝙨𝙩. 𝙁𝙖𝙨𝙩𝙚𝙧. 𝙈𝙎 𝘿𝙝𝙤𝙣𝙞 🫡
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
📹 Watch #CSK legend's jaw-dropping reflexes behind the stumps 🔥
Updates ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/S26cUYzRd8
महेंद्रसिंग धोनीचे स्टंपिंग इतके जलद होती की मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवला काहीच कळले नाही आणि तो आऊट झाला. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे धोनीने फक्त 0.12 सेकंदात सूर्यकुमार यादवला आऊट केले. हेच कारण आहे की सूर्यकुमार यादवला ही काय झाले हे समजू शकले नाही. धोनीचा वेग पाहून तोही आश्चर्यचकित झाला. यासह, 43 वर्षीय धोनीने दाखवून दिले आहे की त्याच्या ग्लोव्हजमध्ये अजूनही तीच जुनी धार आहे.
Chepauk is ROARING! 🦁
— Anshita Sharma (@Anshita57) March 23, 2025
MS Dhoni turns back the clock with a stumping so quick, Suryakumar Yadav didn’t even have time to blink! 🏏
At 43, Thala is still the king behind the stumps. #CSKvMI #IPL2025
pic.twitter.com/MfBtyX3xJi
ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 11 व्या षटकात घडली. नूर अहमद गोलंदाजी करत होता आणि षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने पुढे जाऊन मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला. ज्याचा धोनीने पुरेपूर फायदा घेतला आणि सूर्यकुमार यादवला यष्टीचीत केले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रम धोनीने आधीच केला आहे. आतापर्यंत त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 44 फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. दिनेश कार्तिक 37 स्टंपिंगसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉबिन उथप्पाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 32 फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
एमएस धोनीची आयपीएल कारकीर्द
आयपीएलच्या इतिहासात विकेटमागे सर्वाधिक विकेट घेणारा एमएस धोनी हा विकेटकीपर आहे. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज धोनीने आतापर्यंत 190 विकेट घेतल्या आहेत. धोनी हा आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने 224 डावांमध्ये 5125 धावा केल्या आहेत. धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक 133 सामने जिंकले आहेत. कर्णधार म्हणून 100 सामने जिंकणारा तो एकमेव आहे.
धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने चेन्नईला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे. यासोबत धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. तो एकूण 11 वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. तो सीएसकेसाठी 10 आणि पुणे सुपर जायंट्ससाठी 1 फायनल खेळला. धोनीने चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्याने आतापर्यंत 248 षटकार मारले आहेत. सीएसकेकडून सुरेश रैनाने 219 षटकार मारले.
















